शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

अखेर दोन वर्षांनंतर विज्ञान रथ धावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 12:02 IST

मुंबईहून मागविले पार्ट्स : पुन्हा सुरु होणार विद्यापीठाकडून विज्ञानाचा प्रचार-प्रसार, तब्बल ३८ लाख रुपये आला होता त्यावेळी खर्च

जळगाव : तब्बल दोन वर्षांपासून एका गोडावूनमध्ये अडगळीत पडलेला ‘विज्ञान रथ’ दुरूस्त झाल्यानंतर सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रस्त्यावर धावताना दिसला. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना विज्ञान रथातील २४ वर्किंग मॉडेल्स पाहण्याची संधी मिळणार आहे़विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ग्रामीण आणि आदिवासी भाग येतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी विद्यापीठ व केरला स्टेट सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी म्युझिअम आणि प्रियदर्शनी तारांगण, त्रिवेंदम यांच्यात माजी कुलगुरू डॉ़ के़बी़पाटील यांच्या कार्यकाळात सामंजस्य करार करून विज्ञान रथाची निर्मिती करण्यात आली होती़ तब्बल ३८ लाख रुपए खर्च करून हा रथ तयार करण्यात आला होता़ विज्ञान रथ तयार करणारे महाराष्ट्रातलं पहिले विद्यापीठ होते़नादुरूस्त रथ पडूनदरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून नादुरूस्त असलेला विज्ञान रथ हा विद्यापीठाच्या एका गोडावूनमध्ये अडगळीत पडून होता़ अनेकवेळा दुरूस्तीसाठी त्रिवेंदम येथील संस्थेशी विद्यापीठाकडून पत्रव्यवहार झाले होते़ मात्र, पाठपुराव्या अभावी दुरूस्तीचे काम रखडले होते़ अखेर ‘लोकमत’ व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या पाठपुराव्यानंतर विज्ञान रथाच्या दुरूस्तीच्या हालचालीला सुरूवात झाली़विज्ञान रथात २४ वर्र्कींग मॉडेल्सया रथामध्ये न्यूटन कँडल्स, बॉल, पायथागोरसचा सिद्धांत, फ्लोटिंग मॅॅग्नेट, मॅग्झिमम एरिया, इमेज, लेझी ट्यूब, इलेक्ट्रो मॅग्नेट, कलर फ्लोटिंग मॅजिक, डान्सिंग रिंग्ज, जंपिंग डिस्क, ब्लॅक बॉडी रेडिएशन, कलर मिक्सिंग, मॅकेनिकल स्कॅनर, म्युच्युअल इंडक्शन, व्होरेटेक्स, मिरर इमजे, कॅलिडोस्कोप, डबल कोन रोलिंग अप हिल, टनेल, जनरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी अशा तब्बल २४ वर्र्कींग मॉडेल्सचा समावेश आहे.मुंबईहून मागविले यंत्रांचे सूटे भागविज्ञान रथाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक तंत्रांचे सुटे भाग हे मुंबई येथून मागविण्यात आले़ नंतर हा रथ दुरूस्त करण्यात आला़ दरम्यान, अजुनही दहा ते बारा टक्के रथातील कामे बाकी असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे़ मात्र, रथ दुरूस्ती झाल्यानंतर सोमवारी विद्यापीठ परिसरातील रस्त्यावर धावताना बघायला मिळाला़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून त्यातील वर्कींग मॉडेल पाहण्याची विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव