शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...तर अनेकांचे पितळ उघडे पडणार; राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंचा सूचक इशारा

By विजय.सैतवाल | Updated: October 23, 2022 17:36 IST

पुणे येथील कृषी महाविद्यालय जमीन प्रकरणानंतर अनेकांचे पितळ उघडे पडणार, भोसरी जमीन प्रकरणातील तक्रारदाराशी अनेकांचे हितसंबंध, गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केेले जाते, असा आरोप त्यांनी केला

विजयकुमार सैतवालजळगाव : भोसरी येथील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात तक्रारदार असलेले हेमंत गावंडे यांचा पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन हडपण्याचा उद्देश आपण हाणून पाडला. या व्यक्तीशी अनेक राजकारण्यांचे हितसंबंध आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय जमीन प्रकरण उघड झाल्यास राज्यभरातील अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पडू शकते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला.

रविवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भोसरी येथील जमीन खरेदी-विक्री प्रकरणासंदर्भात बोलताना गावंडे यांनी का तक्रार दिली, याविषयीदेखील माहिती दिली. ते म्हणाले की, गावंडे यांचा पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन हडपण्याचा डाव होता. त्यावेळी आपण विरोधी पक्ष नेते असताना विधीमंडळात आवाज उठविला. त्यानंतर सरकार बदलले व माझ्याकडे कृषी खाते आले व या संदर्भात महाविद्यालयाच्या अधिष्ठांतांना तक्रार देण्यास सांगितली. त्यानुसार गावंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळेच त्यांनी भोसरी प्रकरणाशी आपला संबंध जोडला.

गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केेले जाते, असा आरोप त्यांनी केला. गावंडे यांच्याशी हितसंबंध असलेल्यांमध्ये अनेक मोठे नावं आहे. पुणे कृषी महाविद्यालयाचे जमीन प्रकरण उघड झाल्यास अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पडू शकते, असा दावादेखील त्यांनी केला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसे