शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेनंतर मल्ल पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:10 IST

दृढ आत्मविश्वासाने गाजवित आहे मैदान

ठळक मुद्देजळगावात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेत होणार सहभागीदोन वर्षांपासून होता आखाड्यापासून लांब

जळगाव : गुडघ्याच्या दुखापतीमुळे (लिगामेंट इन्जुरी) कुस्तीपासून दूर गेलेला पंजाबमधील नामांकीत मल्ल अब्दुल गणी हा जळगावात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरला असून बुधवार, २८ रोजी जळगावात होणाºया कुस्ती स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे अब्दुल गणीवर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता, मात्र जळगावातील शस्त्रक्रियेने गणीला आवडीच्या क्षेत्रात आपले स्थान कायम राखण्याची संधी मिळाली.पंजाबमधील रहिवासी अब्दुल गणी हा मल्ल आज देशातील द्वितीय क्रमांकाचा मल्ल आहे. मात्र मध्यंतरी पायातील तीन लिगामेंट तुटल्याने (गुडघ्याची दुखापत) तो कुस्ती खेळू शकणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले होते. देशात अनेक ठिकाणी तो उपचारासाठी गेला मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर जळगावात यावर उपचार होत असल्याची माहिती त्याला मिळाली व त्याने थेट जळगाव गाठले. येथे त्याच्यावर डॉ. मनिष चौधरी यांनी उपचार केले व सर्व निदान झाल्यानंतर गणीवर शस्त्रक्रिया केली आणि हा हिंद केसरी पुन्हा मैदान गाजवू लागला आहे.दोन वर्षांपासून होता आखाड्यापासून लांबकुस्तीची प्रचंड आवड असलेला अब्दुल गणी याने देशात अनेक ठिकाणी मैदान गाजविले आहे. मात्र २०१६मध्ये गणीचे तीन लिगामेंट तुटले आणि कुस्तीचा महत्त्वाचा भाग असलेला गुडघाच काम करीत नसल्याने कुस्ती कशी खेळणार असा प्रश्न उभा राहिला. या दुखापतीमुळे गणी कुस्तीच्या आखाड्यापासून लांब गेला. मात्र त्याने हिंमत हारली नाही. उपचाराच्या बाबतीत अनेक ठिकाणी निराशा पदरी पडल्यानंतर जळगावात यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर गणी पुन्हा मैदानात उतरला. सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असली तरी तो पुन्हा खेळू शकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे होते. त्यात शस्त्रक्रियेनंतर पाचच महिन्यात तो पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरला.जळगावातील स्पर्धेत होणार सहभागीश्रीराम मंदिर संस्थान रथोत्सव समिती आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने शहरात २८ रोजी होणाºया कुस्त्यांच्या स्पर्धेत अब्दुल गणी सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी आपण येत असल्याची माहिती गणी याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.या पूर्वीही अनिल श्रीराम निंबोळकार या कबड्डी खेळाडूवर जळगावात उपचार झाल्याने त्याने थेट कबड्डी प्रो लिगमध्ये धडक मारली होती.लिगामेंट इंजुरीमुळे अनेक खेळाडू मैदानापासून लांब जातात. मात्र योग्य उपचार व शस्त्रक्रियेमुळे ते पुन्हा खेळू शकतात. अब्दुल गणीवरदेखील अशाच प्रकारे योग्य शस्त्रक्रिया झाल्याने तो पुन्हा मैदानात उतरला आहे.- डॉ. मनिष चौधरी.माझ्या लिगामेंट इंजुरीवर जळगावात यशस्वी उपचार झाले. आता मी जळगावात होणाºया कुस्ती स्पर्धेसाठी येत आहे.- अब्दुल गणी, मल्ल.

टॅग्स :Jalgaonजळगाव