शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनंतर खडसे पोहचले फडणवीसांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 11:58 IST

नाराजीबद्दल मात्र मौन कायम

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी सकाळी जळगाव येथे आलेले फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर भेट घेतली. या वेळी खडसे यांनी त्यांच्या नाराजी बद्दल बोलणे टाळल्याने अद्यापही त्यांची नाराजी कायम असल्याचे संकेत मिळत आहे. दुसरीकडे फडणवीस यांच्यावर थेट आरोप झाल्याने त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळत हेलिकॅप्टरमध्ये बसून ते नंदुरबार जिल्ह्यातील धडगावकडे रवाना झाले.जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे-नंदुरबार येथील सभांना जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शुक्रवारी पहाटे जळगावात जैन हिल्स येथे आगमन झाले. त्यावेळी जळगाव जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून खडसेंनी त्यांची भेट घेतली.जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू असताना व या पदांचे नावे प्रदेशाध्यक्षकांकडे पाठविलेले असताना फडणवीस हे जळगावात आले तरी त्यांच्या भेटीसाठी एकनाथराव खडसे हे आलेले नव्हते. त्यामुळे खडसे यांनीच आरोप केलेल्या फडणवीस यांच्या भेटीला ते येता की नाही, या बाबत चर्चा सुरू होती. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाच्या चर्चेसाठी तुम्ही फडणवीस यांची भेट घ्या, अशा सूचना खडसे यांना केल्या व त्यानंतर खडसे हे फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहचले.खडसेंचे नाराजीबद्दल मौनया भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे व महाजन यांनी या वेळी केवळ जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. खडसे यांनी नाराजी कायम आहे का, या बद्दल बोलणे टाळत मौन बाळगले. त्यामुळे त्यांची अद्यापही नाराजी कायम असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव