जळगाव : आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने जोरदार सलामी दिल्याने शेतकरी सुखावला असून त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. यंदाही जळगाव तालुक्यात कपाशी लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.मान्सून पूर्व पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला जोरदार वादळी वाऱ्यासह वरुणराजाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पाठ फिरवली. बागायती क्षेत्र असलेल्यांनी कापसाची लागवड केली मात्र कोरडवाहू शेती असलेल्या शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत होते. काही शेतकºयांनी धूळ पेरणी केली होती. २२ जून पासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे कोरडवाहू शेतकºयांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. सकाळीच मजुरांना घेऊन शेतकरी कपाशी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग पेरणी करताना शेतात दिसत होते.
समाधानकारक पावसानंतर जळगाव तालुक्यात पेरण्यांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 17:58 IST
आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने जोरदार सलामी दिल्याने शेतकरी सुखावला असून त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. यंदाही जळगाव तालुक्यात कपाशी लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.
समाधानकारक पावसानंतर जळगाव तालुक्यात पेरण्यांना सुरुवात
ठळक मुद्देदमदार पावसाने शेतकरी सुखावलाकपाशीच्या लागवडीला झाली सुरुवातपेरणीसाठी लगबग सुरु झाल्याने गावात सन्नाटा