शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर निवडणूकीनंतरच उमवित होणार सिनेटची स्थापना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 21:45 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन मंडळ, विद्या  परिषद व अभ्यासमंडळाच्या प्रतिनिधींसाठीची निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे लवकरच प्राधिक रणे गठीत करण्यात येणार आहेत. मात्र अधिसभेसाठी पाठविण्यात येणाºया पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणूकीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतरच सिनेट गठीत होवू शकणार आहे. 

ठळक मुद्देराज्यातील अकरा विद्यापीठांमध्ये उमवि आघाडीवरन्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक थांबली अभ्यासमंडळाची लवकरच होणार स्थापना

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२०-उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन मंडळ, विद्या  परिषद व अभ्यासमंडळाच्या प्रतिनिधींसाठीची निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे लवकरच प्राधिक रणे गठीत करण्यात येणार आहेत. मात्र अधिसभेसाठी पाठविण्यात येणाºया पदवीधर प्रतिनिधींच्या निवडणूकीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतरच सिनेट गठीत होवू शकणार आहे. 

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या प्राधिकरणासाठीच्या प्रतिनिधींची निवड झाली असून, लवकरच प्राधिकरणांची स्थापना विद्यापीठाकडून टप्प्या-टप्प्याने केली जाण्याची शक्यता आहे. सिनेट गठीत पदवीधर गटाच्या निवडणुकीनंतर होणार असली तरी विविध अभ्यास मंडळाची फॅकल्टी तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये निवडणुकीत विजयी झालेले सदस्यांसह व कुलगुरुंकडून ६ नामनिर्देशित सदस्यांच्या बैठका घेण्यात येतील. त्यामधून अभ्यास मंडळाची फॅकल्टी तयार करण्यात येणार आहे. येत्या  पंधरा दिवसात अभ्यासमंडळाची स्थापना होण्याचा अंदाज आहे. 

विद्या परिषदेसाठी कुलपतींकडून काही सदस्यांची होणार नियुक्तीअभ्यासमंडळाच्या स्थापनेनंतरच विद्या परिषदेची  स्थापना होणार आहे. यामध्ये कुलगुरुंकडून ८ प्राचार्यांची व कुलपती म्हणजेच राज्यपालांकडून काही नामनिर्देशित सदस्यांची निवड विद्या परिषदेसाठी करण्यात येईल. राज्यातील सर्व विद्यापीठाना १ सप्टेंबर पर्यंत प्राधिकरणे स्थापना करण्याचा सूचना होत्या. मात्र काही अडचणींमुळे त्या होवू शकल्या नाही. आता ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना प्राधिकरणे गठीत करून घ्यावी लागणार आहेत. 

व्यवस्थापन व अधिसभेसाठी निकालाची प्रतिक्षाव्यवस्थापन मंडळ व अधिभसभेसाठी पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या सदस्य मतदान करत असतात. मात्र अद्याप पदवीधर गटातील निवडणुकीसाठीच्या मतदार याद्यांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने विद्यापीठाकडून ही निवडणूक घेण्यात आली नाही. त्यामुळे जो पर्यंत न्यायालयाकडून काही सूचना येणार नाहीत. तो पर्यंत पदवीधर गटातील निवडणूक होवू शकणार नाही. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ व अधिसभा गठीत करण्यासाठी न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र तो पर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून विद्या परिषद व अभ्यास मंडळ गठीत होण्यची शक्यता आहे. 

राज्यातील अकरा विद्यापीठांमध्ये उमवि आघाडीवरउत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या प्राधिक रण गठीत करण्यासाठीच्या प्रतिनिधीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. अद्याप राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये निवडणूक कार्यक्र्रम जाहीर करण्यात आलेला  नाही.त्यामुळे राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये उमविने आघाडी घेतली आहे. तसेच लवकरच विद्यापीठाकडून प्राधिकरणे देखील गठीत केली जाणार आहे. विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांसाठी अद्याप राज्य शासनाकडून काही सूचना आलेल्या नाही. राज्य शासनाकडून काही सूचना आल्यास या निवडणूका देखील लवकर पार पाडण्याचीही उमविची तयारी आहे.