शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केल्यावरून टाकरखेड्यात घर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:33 IST

जातीय तणाव : १५० जाणांवर गुन्हा दाखल

अमळनेर : मागासवर्गीय समाजाच्या मुलाने सवर्ण समाजाच्या मुलीशी लग्न केले म्हणून संतप्त गावकऱ्यांनी मागासवर्गीय कुटुंबाच्या घराची मोडतोड करून सामानाची लूट केली. याचबरोबर दहशत निर्माण करून बहिष्कार टाकल्याची घटना २० रोजी रात्री घडली. याप्रकरणी १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचेही कलम लावण्यात आले आहे.या खळबळजनक घटनेबाबत माहिती अशी की, टाकरखेडा येथील आत्माराम गंगाराम पवार यांचा मुलगा संदीप ह. मु. सुरत याचे एका सवर्ण समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याने त्याने तिच्याशी पळून जाऊन विवाह केला. ते कुटुंब आंबेडकर जयंतीनिमित्त गावी आले होते.२० रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास प्रल्हाद पाटील, युवराज पाटील, प्रकाश पाटील, विलास पाटील, शंतनू पाटील, युवराज देवराम पाटील, विश्वास पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, भास्कर पाटील, श्रीराम पाटील, रामचंद्र पाटील, नाना पाटील, जगदीश पाटील, धनराज पाटील, बाळू पाटील् , नामदेव पाटील, मयूर पाटील, मनोज पाटील , महेश पाटील, संदीप पाटील, अतुल पाटील, किरण पाटील , ज्ञानेश्वर पाटील , सोपान पाटील, ज्ञानेश्वर नागराज पाटील, पितांबर व इतर १५० ते २०० लोकांनी २० रोजी रात्री दीड वाजेच्या दरम्यान लाढ्या काढ्या व पेटत्या मशाली घेऊन घरात घुसून घराची तोडफोड केली व घर पाडून टाकले. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी पळ काढून अमळनेर येथे फरशी रोडवर आश्रय घेतला. सदर प्रसंगी सवर्ण समाजाच्या लोकांनी दम दिला की, पुन्हा गावात पाय ठेवू नका नाहीतर तुमचा खून होईल अशा प्रकारची फिर्याद आत्माराम गंगाराम पवार यांनी दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला भादवी १४३ , १४७ , १४८, १४९ प्रमाणे दंगल , ३९५ प्रमाने लूटमार तर ४२७ प्रमाणे मालमत्तेचे ८ ते १० लाखाचे नुकसान केले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहे.दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून काही तरुणांनी टाकरखेडा येथील लोकांना अमळनेर येथे महाराणा प्रताप चौकात मारहाण केलयाचे समजते. घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अमळनेर पोलीस स्टेशनला येऊन अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने तपास करा व निरपराध व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी