शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील वाघूर पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणात अखेर दोषारोपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 12:29 IST

माजी नगराध्यक्ष प्रदीप रायसोनींसह सहा जणांचा समावेश

जळगाव : दीर्घ प्रतीक्षेनंतर वाघूर पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणात बुधवारी न्या. सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या दोषारोपपत्रात माजी नगराध्यक्ष प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, सदाशिव गणपतराव ढेकळे ,तत्कालिन मुख्याधिकारी पी.डी.काळे व तापी प्रिस्टेट या कंपनीचे संचालक मोतीलाल कोटेचा यांचा समावेश आहे. दरम्यान,कोटेचा यांचे निधन झालेले आहे.तत्कालिन जळगाव नगरपालिकेच्या वाघुर पाणी पुरवठा योजनेत माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांनी ३० कोटीचा तात्पुरता व १२ कोटी रुपयांचा कायमचा अपहार केल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी केली होती. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनला जुलै २०१२ मध्ये गु.र.नं.६९/२०१२ भादवि कलम ४०४, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.तपासाधिकारी प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांन ५ डिसेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार सर्व संशयित सकाळी अकरा वाजेपासून हजर होते. दुपारी बच्छाव यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले. वाघुर पाणी पुरवठा योजनेचे काम मोतीलाल कोटेचा यांच्या तापी प्रिस्टेट या कंपनीला संगनमताने देण्यात आले होते. त्यासाठी २५ टक्के इतकी रक्कम विना व्याज अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात आली होती. त्यामुळे नगरपालिकेचे ६ कोटी १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव