शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना करावा लागतो तांत्रिक अडचणीचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:36 IST

रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

भुसावळ : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाºया जुन्या पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगातून बहुतांश समस्या सुटलेल्या आहेत, मात्र पेन्शनधारकाच्या विधवा महिलेची किंवा अविवाहित मुलींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रुटी दूर झाल्यास वृद्धापकाळात बँकेचे फेरे मारावे लागणार नाहीत.जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन लागू आहे व यानंतर पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या पेन्शनधारकांना अंशत: समस्यांचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारक सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा महिला किंवा अविवाहित मुलीला पेन्शन शासनाला देयक असते. यासाठी किचकट प्रक्रियेनंतर पेन्शन वारस महिला, मुलीच्या नावावर होते अर्थातच जे वारस असतात त्यांच्या नावावर पेन्शन करण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये मात्र वयोवृद्ध महिला व अविवाहित किंवा मतिमंद मुलींना फार त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने साधे सरळ नियम करून पेन्शन संबंधित कर्मचाºयांच्या वारसांच्या नावावर करणे अपेक्षित आहे व तशी अपेक्षा करण्यात येत आहे. तसेच रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.जुन्या शासकीय पेन्शनधारक कर्मचाºयाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पेन्शन वारसांनी जन्मतारखेसह इतर शासकीय माहिती वेळोवेळी रेल्वेला अपडेट करावी. जेणेकरून वाढीव पेन्शनचा त्यांना लाभ घेता येईल.-पुंडलिक जावडे, अध्यक्ष, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन, भुसावळजुन्या पेन्शन योजनेंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून ९० टक्के समस्यांचे निराकरण झाले आहे. मात्र पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात वारसदारांना पीपीओ लवकर मिळावे, रेल्वे पासमध्ये किचकट प्रक्रिया न करता त्वरित उपलब्ध करून द्यावी.-एन.आर.सरोदे, खजिनदार, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनधारक असोसिएशन, भुसावळअविवाहित कर्मचारी सेवेत असताना त्याच्या पश्चात त्यांची अविवाहित बहीण किंवा घटस्फोट झालेली बहीण असेल तर त्यांनाही पेन्शनमध्ये वारस म्हणून मान्यता मिळावी. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा चर्चासुद्धा झालेले आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.-राजेंद्र झा, अध्यक्ष, आॅडनस फॅक्टरी कामगार युनियन, भुसावळजुने पेन्शनधारक ज्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक आहे त्यांच्या बोटाचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे जुन्या रेकॉर्डशी जुळत नाहीत. त्यांना पेन्शन नाकारले जाते किंवा अर्ज करून विलंब लागतो. काही असाध्य आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनाही बँकेत येण्याची सक्ती केली जाते. पेंशन खाते दोघांच्या संयुक्त नावे नसते. त्यामुळे मृत्यनंतर वारसाला त्रास होतो. हयातीचा दाखला दिल्यावरही हयातीचा दाखला मागतात.-प्र.ह.दलाल, ज्येष्ठ नेते, शिक्षक संघटना, भुसावळ

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकBhusawalभुसावळ