शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

कर्जमाफी दिल्यास आत्महत्या न करण्याचे शपथपत्र

By admin | Updated: March 20, 2017 00:31 IST

मुख्यमंत्र्यांनी सरकट कर्जमुक्ती द्यावी : जळगाव ते मुंबईपर्यंत निघणार शेतकरी क्रांती मोर्चा

जळगाव : कर्जमुक्ती नंतर आत्महत्या होणार नाहीत याची हमी मागणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही सातबारा उताºयावर आत्महत्या न करण्याचे शपथपत्र लिहून देतो. मात्र शेतकºयांना सरसकट व विनाअट कर्जमाफी द्यावी. त्यासाठी शेतकरी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जळगाव ते मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार व काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.ख्वॉजामिया रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी १२ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत  शेतकरी गुलाबराव पाटील (सोनवद), मनोज चौधरी (आवार), निंबा भदाणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.नोटबंदीच्यावेळी हमी दिली होती का?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय लागू केला. त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार कमी होईल, दहशतवाद निर्मूलन होईल तसेच काळा पैसा बाहेर निघेल यासाºयाची हमी दिली होती का? जि.प. व पं.स.निवडणुकीतील यशामुळे मुख्यमंत्री हे अहंकारी झाल्याचा आरोप त्यांनी केला.सातबारा संकलित करून शपथपत्र देणारपंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा केली. महाराष्ट्रात कर्जमाफी देण्यास अडचण काय आहे. शेतकºयांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकरी क्रांती मोर्चामार्फत जळगाव ते मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे जिल्हा बँक संचालक संजय पवार यांनी सांगितले. सर्व शेतकºयांचे सातबारा उतारे संकलित करून त्यावर आत्महत्या न करण्याची हमी असलेले शपथपत्र देणार असल्याचे त्यांनी              सांगितले.पतमर्यादा निश्चित करून बिनव्याजी कर्ज द्याजिल्हा बँकेत तीन लाख २७ हजार ५६६ कर्जदार शेतकरी आहेत. त्यापैकी १ लाख २० हजार शेतकरी हे नियमित कर्ज भरणारे आहेत. तर १ लाख ४७ हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच भविष्यात बिनव्याजी कर्ज द्यावी तसेच शेतकºयांसाठी  पतधोरण निश्चित                     करावे अशी मागणी त्यांनी                                    केली.  एकाही आमदाराने राजीनामा का दिला नाही?शेतकरी हा कोणत्या पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा नसतो. भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीतील सर्वच आमदार शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी तयार आहेत मग निर्णयाचे घोडं अडकल कुठं आहे. आपल्या मानधनासाठी समर्थन देणाºया एकाही आमदाराने कर्जमुक्तीसाठी राजीनामा का दिला नाही असा सवालही पवार यांनी केला. हे सरकार, शेतकºयांची चेष्टा करणारे सुरुवातील ब्रिटीशांनी नंतर आघाडी सरकारने व आता भाजपा सरकारने शेतकºयांचे हाल चालविल्याचा आरोप सोनवद येथील शेतकरी गुलाबराव नथू पाटील यांनी केला. मोदींच्या रुपाने आपले स्वप्न पूर्ण करणारा पंतप्रधान मिळाल्याची भावना शेतकºयांमध्ये होती. मात्र काही दिवसातच भ्रमनिरास झाला. शेतमालाचे अधिकार नाहीशेतकºयाला अन्नदाता व जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र आम्ही जो माल पिकवितो त्याचा भाव आम्ही ठरवू शकत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. नोटबंदीच्या काळात शेतकºयांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर गंगा शुद्धीकरणासाठी प्रयत्न करावेसरकारचा आडमुठ्ठेपणा, निसर्गाचा लहरीपणा, पिकाला भाव नाही यासाºयात कुठं आहे सरकारची पारदर्शकता. सुरुवातीला सरकारने आपले मन शुद्ध करावे, शेतकºयांप्रती सरकारची दानत शुद्ध असावी त्यानंतर गंगा शुद्धीकरणासाठी प्रयत्न करावे असे पाटील यांनी सांगितले.