शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

अ‍ॅड.रवींद्र पाटील : अध्यात्म व सहकारातील वारकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:30 IST

राजकारणासह समाजकारण करणाऱ्या बोदवड तालुक्यातील मनूर येथील पाटील घराण्याची परंपरा अविरत वाहणाºया झºयासारखी सुरू आहे.

गोपाल व्यासजळगाव : जिल्ह्यायात सहकारमहर्षी कै.प्रल्हादराव एकनाथराव पाटील व त्यांच्या सेवेचा वसा घेतलेले वारस अ‍ॅड.रवींद्र पाटील.ल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मनूर येथील स्वातंत्र्य सेनानी व तत्कालीन आमदार कै.एकनाथराव संपतराव पाटील यांचा वारसा चालविणारे सहकारमहर्षी कै.प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांनी आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारणाचा विचार केला.शिखर बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. बोदवड आणि जामनेर तालुक्यातील कोरडवाहू शेतकºयांसाठी तापी नदीतून मुक्ताई जलउपसा योजना सुरू करून शेतकºयांच्या शेतीला नवी दिशा त्यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ४० हजार हेक्टरला सिंचनाची व्यवस्था होईल, अशी महाराष्ट्रातील एकमेव अभूतपूर्व अशी इरिगेशन योजना होती. ही उपसा योजना असून त्यासाठी त्यांनी त्याकाळी ४८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ती नऊ वर्षे व्यवस्थित चालली. शेतीला पाणी मिळाल्याने बागा फुलवू लागले. परिणामी आर्थिक उत्पन्न वाढल्याने येथील शेतकरी सधन, सक्षम बनला.सुरवातीला त्यांनी गावचे सरपंच म्हणून उत्तम कारभार केला. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तालुका सभापती म्हणून त्यांनी गावचा सरपंच ते शिखर बँकेचा अध्यक्ष अशी पदे त्यांना मिळाली. त्यांच्या संघटन कौशल्याची दाद खुद्द शरद पवार यांनी दिली होती.प्रल्हादरावांचे राजकारण व सहकाराचे कार्य त्यांचे पुत्र अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सुरू ठेवले आहे. राजकारण, समाजकारण व अर्थकारण या तिन्ही क्षेत्रात जनसेवेचा वारसा अ‍ॅड.रवींद्र पाटील हे जोपासत आहेत, तेही जिल्हा परिषद सदस्य तसेच अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, पणन संघाचे संचालक, मुक्ताई मंदिर संस्थानचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी जबाबदारी पार पाडत आहेत. दरवर्षी न चुकता पंढरीच्या वारीला जाण्याचा आपल्या वडिलांचा वारसा ते नित्यनेमाने जोपासत आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव