शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

जळगावात गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 21:51 IST

घरात गळफास

जळगाव- ‘मेरे कर्म और स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया देंगे, अशा आशयाची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहून प्रमोद लालचंद दायमा (५०, रा. भिलपुरा चौकीजवळ, शनीपेठ ) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता उघडकीस आली.शहरातील भिलपुरा चौकीजवळ प्रमोद दायमा हे पत्नी राजश्री सोबत वास्तव्यास होते. मुलगा कृष्णा हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुण्याला नोकरी करतो. मुलगी राजश्री ही विवाहित आहे. प्रमोद दायमा हे त्यांचे नातेवाईक डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्या आयुर्वेदीक दवाखान्यात औषधी बनवायचे काम करीयचे. तर पत्नी राजश्री मेहंदी आर्टिस्ट आहे. आॅर्डर मिळेल त्यानुसार त्या मेहंदी काढून देण्याचे काम करतात.मोलकरणीमुळे प्रकार उघडराजश्री या गुरुवारी दुपारी १ वाजता आॅर्डरनुसार मेहंदी काढावयास गेल्या होत्या. प्रमोद हे घरी एकटेच होते. यादरम्यान त्यांनी छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी साडे जार वाजता घर कामावर असलेली मोलकरीण आली असता तिला प्रमोद दायमा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांनी तत्काळ असलेल्या डॉ. त्रिपाठी यांच्या रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉ. ओमप्रकाश त्रिपाठी यांच्यासह दायमा यांचे शालक मनपाचे नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. राजश्री दायमा यांचा मन हेलावणारा आक्रोश होता. माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.अशी आहे मृत्युपूर्व चिठ्ठीप्रमोद दायमा यांनी मृत्युपूर्वी लिहलेली हिंदी भाषेतील चिठ्ठी आढळून आली आहे. यात त्यांनी ‘मेरे कर्म और मेरे स्वभाव मुझे जीने नही देंगे, ज्यादा तकलीफीया बढायेंगे, इसलिये मै फाशी ले रहा हू, मेरी सुसाईड को किसीको भी जिम्मेदार ना ठहराना असे म्हटले आहे. शनिपेठ पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव