शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण

By admin | Updated: October 15, 2015 23:49 IST

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्याथ्र्याच्या वसतिगृहात गुरुवारी सायंकाळी आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली़

धुळे : शहरात देवपूर भागातील चंदननगर परिसरात असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्याथ्र्याच्या वसतिगृहात गुरुवारी सायंकाळी आदिवासी विद्याथ्र्याना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली़ या घटनेनंतर मारहाण झालेल्या राहुल रघुनाथ पावरा (इ. दहावी) याच्यासह विद्याथ्र्यानी आमदारांचे घर गाठल़े आमदारांनी विद्याथ्र्याचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणला़ जिल्हाधिका:यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल़े

शहरातील देवपूर भागातील चंदननगर परिसरात समाज कल्याण विभागांतर्गत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्याथ्र्याचे वसतिगृह आह़े या वसतिगृहात दररोज सकाळी व सायंकाळी परिसराची स्वच्छता केली जात़े त्यानंतरच विद्याथ्र्याना जेवण दिले जात़े दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास परिसर स्वच्छतेवरून विद्याथ्र्याच्या दोन गटात वाद झाला़ त्यानंतर एका गटाने बाहेरून काही मुलांना बोलावले, शिवाय त्यांचे पालकही आले व त्यांनी दुस:या गटातील जेवायला बसलेल्या आदिवासी विद्याथ्र्याना फाईटने बेदम मारहाण केली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आह़े

वसतिगृह अधीक्षक पळाले

ही घटना घडत असताना विद्याथ्र्याना मदत करण्याऐवजी वसतिगृहाच्या अधीक्षकांनी चक्क पळ काढला़ अन्य शिक्षकही याठिकाणी थांबले नाही़ पाचवी ते दहावीच्या वर्गातील लहान मुलांना बेदम मारहाण झाल्याने त्यांनी आपले सर्व सामान सोबत घेऊन थेट आमदार अनिल गोटे यांचे घर गाठल़े आमदारांच्या घरार्पयत पोहचलेले हे विद्यार्थी त्याठिकाणी पोहचेर्पयत रडत असल्याचे दिसून आल़े अनेक विद्याथ्र्याच्या अंगावर वळ पडलेले दिसून आल़े आमदार अनिल गोटे यांनी या विद्याथ्र्याची समजूत काढत तत्काळ पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली़ तत्काळ गोटे यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त पोहचला़

मोर्चाचा निर्णय

घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार गोटे यांनी विद्याथ्र्याची समजूत काढत त्यांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे नेण्याचा निर्णय घेतला़ आमदार गोटे, भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या बंगल्यावर पोहचल़े तेथे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा उपस्थित होता़

जिल्हाधिका:यांचे आश्वासन

जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्याथ्र्याची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली, तसेच याप्रकरणी अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल़े त्यानुसार काही विद्याथ्र्याना फिर्याद देण्यासाठी नेण्यात आले, तर उर्वरित विद्याथ्र्याना पोलिसांच्या पिंजरा गाडीने वसतिगृहात पोहचविण्यात आल़े संबंधित वसतिगृहात 170 विद्यार्थी राहत असल्याचेही विद्याथ्र्याकडून सांगण्यात आल़े यापूर्वीही मारहाणीच्या घटना घडल्या आहेत; परंतु आम्ही शांतपणे अन्याय सहन करत होतो, असेही काही विद्याथ्र्याकडून सांगण्यात आल़े

वसतिगृहास बंदोबस्त

या घटनेनंतर जिल्हाधिकारी मिसाळ यांनी दिलेल्या आदेशानंतर वसतिगृहाला बंदोबस्त पुरविण्यात आला, तर आमदार गोटे यांनीदेखील लोकसंग्रामच्या कार्यकत्र्याना वसतिगृहात विद्याथ्र्यासोबत थांबण्यास सांगितल़े

विद्याथ्र्यामध्ये घबराट

दरम्यान, सदर घटनेमुळे भेदरलेले विद्यार्थी जिल्हाधिका:यांना घटनेची माहिती देताना हुंदके देत होत़े त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्दही निघत नव्हत़े बहुतांश विद्याथ्र्याचे अश्रू थांबत नव्हत़े जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी विद्याथ्र्याची समजूत काढली.