शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी 25 लाखांसाठी भरला दम, न्यायालयात उलगडला डांबून ठेवल्याचा घटनाक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 12:42 IST

खंडणी प्रकरण

ठळक मुद्देकंत्राटदारासाठी घेतले 21 लाखाचे धनादेशलोहार यांच्यासह तिन्ही संशयित हजर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16-  मनोज लोहार यांनी डांबून ठेवत 25 लाख रुपये दिल्याशिवाय तुझी सुटका करणार नसल्याचा दम भरल्याची माहिती डॉ.उत्तमराव महाजन यांनी सोमवारी न्यायालयात दिली.चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्याच्या खटल्याचे कामकाज न्या.पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सुरु  आहे. फिर्यादी डॉ. महाजन यांनी लोहार व उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर, धीरज येवले व अनिल देशमुख  यांनी कसा छळ केला याची माहिती न्यायालयाला दिली.दुस:या दिवशी सकाळी आठ वाजता मुलगा मनोज हा भेटायला आला असता, या दोन्ही कर्मचा:यांनी लोहार यांचे नाव सांगून त्याला मला भेटू दिले नाही. त्यावेळी आरडाओरड व गोंधळ झाल्याने लोहार यांनी मुलाला त्यांच्या कार्यालयात बोलावले. सकाळी दहा वाजता लोहारांच्या कार्यालयात आणले तेथे माझा मुलगा मनोजही आला होता. त्याला तेव्हाही भेटू दिले नाही.एस.पीं.ना कळविल्याने लोहार यांनी केली शिवीगाळसासरे पैसे घेऊन येत असल्याचे सांगितल्यानंतर लोहार यांनी स्वत: फोनवरुन संभाषण ऐकले व तीन वाजेर्पयतची मुदत दिली. त्याचवेळी निंबाळकर याच्या मोबाईलवर पोलीस अधीक्षकांचा फोन आला व महाजन तेथे आहेत का? अशी विचारणा त्यांना केली. हा प्रकार समजल्यानंतर लोहार यांनी पोलीस अधीक्षकांना कोणी सांगितले असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी  पोलीस अधीक्षक स्वत: माङयाशी बोलले व काही म्हणणे असेल   तर  कार्यालयात येऊन सांगा असे त्यांनी सांगितले. हा प्रकार पाहिल्यानंतर लोहार यांनी  हे प्रकरण इथेच मिटवू,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करु नका असे सांगत पुन्हा दम भरला.कंत्राटदारासाठी घेतले 21 लाखाचे धनादेशमहाजन यांच्याविरुध्द तक्रारदार देणा-या कंत्राटदारासाठी 21 लाख व स्वत: लोहार यांच्यासाठी 25 लाख रुपये मागण्यात आले होते. त्यासाठी 1 जुलै रोजी दुपारी एक वाजेर्पयत लोहार यांनी मुदत देत दम दिला होता. 30 जून रोजी डांबून ठेवल्याची माहिती नातेवाईक व कार्यकत्र्याना मिळाल्याने लोहार यांनी तातडीने रात्रीतून जागा बदलवून येवले याच्या काकाच्या घरी गच्चीवर नेले होते. यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून नेण्यात आले.एका बाजुने निंबाळकर तर दुस:या बाजुने येवले बसलेला होता.  तेथे रात्री दोन वाजता 21 लाखाचे धनादेश लिहून घेतले होते.लोहार यांच्यासह तिन्ही संशयित हजरसरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, मुळ फिर्यादीतर्फे अॅड.पंकज अत्रे, अॅड.अविनाश पाटील, मनोज लोहार यांच्यातर्फे अॅड.निलेश घाणेकर (औरंगाबाद), अॅड.सुधीर कुळकर्णी, निंबाळकरतर्फे अॅड.सागर चित्रे व येवलेतर्फे अॅड.आर.के.पाटील यांनी काम पाहिले. मंगळवारी उलटतपासणी होणार आहे. यावेळी न्यायालयात लोहार यांच्यासह तिन्ही संशयित हजर होते. लोहार सध्या नाशिक येथे विभागीय नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक या पदावर आहेत.