शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील सत्तेचा दुरूपयोग करीत खडसेंच्या मुक्ताई कारखान्याला जादा कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:19 IST

आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार

जळगाव : एकीकडे सहकारी साखर कारखान्यांना किरकोळ रक्कमांचे कर्ज देण्यास, शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया जिल्हा बँकेकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहीणी खडसे यांची भागीदारी असलेल्या संत मुक्ताई साखर कारखान्यास मात्र किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले आहे. हा सत्तेचा दुरूपयोग असून या गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार देणार असल्याची माहिती अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.गुरूवारी सायंकाळी पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी हा आरोप केला.आमदार पाटील यांनी सांगितले की, संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि.घोडसगाव ता.मुक्ताईनगर हा खाजगी कारखाना आधी ४९ कोटींना शिवाजी जाधव यांनी घेतला. नंतर अ‍ॅड.रोहिणी खडसे ह्या त्यात भागीदार झाल्या. या खाजगी कारखान्यासाठी ५१ कोटी कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले. त्यापैकी उचल मात्र केवळ ३० कोटींचीच करण्यात आली.मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रारजिल्हा बँकेत सहकारी कारखाने व शेतकऱ्यांना कर्जासाठी फिरवाफिरव होत असून खाजगी कारखान्यांवर मेहेरबानी केली जात आहे. या सर्व गैरकारभाराबाबत मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली. तसेच सोमवारी प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करणार आहे. तसेच कोर्टातही याचिका दाखल केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्र्यांशीही संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही.आमदार पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्नकारखान्यास ५१ कोटींचे कर्ज मंजूर असताना ३० कोटींचीच उचल का केली?आधी दिलेल्या कर्जाचे थकबाकीदार असताना नव्याने कर्ज कसे दिले जात आहे?कारखान्याची किंमत ४९ कोटी असताना आधी ५१ कोटी कर्ज दिले. तसेच आता ८१ कोटी ९६ लाख व साखर तारण ठेवून ५५ कोटी देण्याची तयारी ठेवली आहे. कर्ज देताना तिप्पट रक्कमेची मालमत्ता असे आवश्यक असताना ४९ कोटींच्या कारखान्यास १८८ कोटींचे कर्ज कसे दिले जाऊ शकते?सहकारी क्षेत्रातील जिल्हा बँक सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करते. मात्र खाजगी कारखान्यावर इतकी मेहेरबानी का?सहकार व खडसे समजायला दुसरा जन्म घ्यावा लागेल... खडसे, सहकार, कारखाना आणि जिल्हा बँक समजून घ्यायला आमदार चंद्रकांत पाटील यांना दुसरा जन्म घ्यावा लागेल. जिल्हा बँकेला उर्जितावस्था ती खाजगी कारखान्यांना कर्ज दिल्यामुळेच. सुमारे ४० कोटी रूपये बँकेला व्याजापोटी भरले. मधुकर सहकारी साखर कारखाना बंद आहे. त्याला सरकारची थकहमी पाहिजे. चंद्रकांत पाटील हे सत्तेत आहेत. त्यांनी सरकारकडून मसाकाला थकहमी मिळवून द्यावी. सहकारी व खाजगी कारखान्यातील फरक त्यांनी समजून घेतला पाहिजे. खाजगी कारखान्याला थकहमी लागत नाही. तसेच संत मुक्ताई कारखान्याची किंमत आता ११० कोटी रूपये आहे. त्यावर ३० कोटी कर्ज आहे. ते देखील विजनिर्मितीसाठी घेतले आहे. रोज वीज विकतो. रोज पैसा बँकेच्या एस्क्रो अकाऊंटला जमा होतो. मात्र चंद्रकांत पाटील यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी, असे वाटत नाही.-एकनाथराव खडसे, माजी आमदार व संचालक जिल्हा बँक.मी अदानीपेक्षा मोठाचंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे हे जिल्ह्याचे अदानी असल्याचा आरोप केला होता. त्याला खडसे यांनी ‘मी अदानीपेक्षा मोठा आहे’ असे प्रत्युत्तर दिले.सेनेचेच उपाध्यक्ष अन् संचालकजिल्हा बँकेत शिवसेनेचेच उपाध्यक्ष व संचालक असल्याचे तसेच राष्टÑवादीचेही संचालक असताना ते विरोध का करीत नाहीत ? अशी विचारणा केली असता आमदार पाटील म्हणाले की मी सेनेचा नाही, अपक्ष आमदार आहे. तसेच मला हा प्रकार चुकीचा वाटला म्हणून विरोध केला. त्या संचालकांनाही मी विरोध करण्याचे आवाहन करतो, असे सांगितले. 

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव