शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

....तर आमदारांच्या एक कोटींच्या निधीवर येणार संक्रांत; मतदारसंघात ५० टक्के खर्च केल्यावरच वाढीव निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2023 17:17 IST

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  2022-23 या आर्थिक वर्षापासून अनुज्ञेय ५ कोटींच्या निधीत एक कोटी वाढीव निधी असतो.

- कुंदन पाटील

जळगाव : मतदारसंघासाठी दिलेला निधी ५० टक्के खर्च व ८० टक्के विकास  कामांना प्रशासकीय मान्यता असल्यावरच यापुढे आमदारांना वाढीव १ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात त्यादृष्टीने प्रत्येक आमदारांला काळजी घ्यावी लागणार आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  2022-23 या आर्थिक वर्षापासून अनुज्ञेय ५ कोटींच्या निधीत एक कोटी वाढीव निधी असतो. प्राप्त निधीपैकी ज्या मतदारसंघाचा खर्च ५० टक्के व  प्रशासकीय मान्यता झालेली विकास कामे  ८० टक्के असल्यावरच वाढीव निधी वितरीत करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यादृष्टीने वित्त विभागाने राज्यभरातील जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार या अटी पूर्ण न करणाऱ्या मतदारसंघांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि १ कोटींचा वाढीव अनुज्ञेय निधी वितरीत करण्या संदर्भात सूचित करण्यात आले आहे.

आमदारांनी केलेल्या खर्चाची व प्रशासकीय मान्यतेची टक्केवारी

आमदार          खर्चाची टक्केवारी            प्रशासकीय मान्यतेची टक्केवारीलता सोनवणे      ९७.८८                                  ९९.१८गिरीश महाजन    ६४.२०                                 १३५.१६सुरेश भोळे          ९५.८७                                १३१.५२गुलाबराव पाटील  ८५.२४                               १०७.५५चिमणराव पाटील   ७९.०८                            १२५.२०अनील पाटील        ९९.३७                             १४९.९७किशोर पाटील        ९९.४७                            १२८.४६मंगेश चव्हाण         ७९.३७                            ९३.८३संजय सावकारे      ९९.८४                             १४६.६१चंद्रकांत पाटील      ९९.५३                             १३२.०७शिरीष चौधरी         ३०.२५                            १०४.१५एकनाथ खडसे       ३०.२५                            १०४.१६चंदूलाल पटेल         १००                               ९९.९७

टॅग्स :Jalgaonजळगाव