शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात अन्न व औषध विभागाने तपासणीसाठी अंडी घेतली ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 20:11 IST

अमळनेरमध्ये कृत्रीम अंडे विक्री होत असल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी केल्यानंतर औषध व अन्न प्रशासनाच्या अधिकाºयांनी एका विक्रेत्याकडे छापा टाकून नमुने ताब्यात घेतले आहेत.

ठळक मुद्देकार्यकर्त्याने आमदारापुढे कृत्रीम अंड्याचा करून दाखविला होता प्रयोगअमळनेरकरांमध्ये माजली खळबळअंड्यांचे नमुने पुणे किंवा मुंबईला प्रयोगशाळेत तपासणीसाठी जाणार

लोकमत आॅनलाईनअमळनेर, दि.११ :  शहरात कृत्रिम अंडे आढळून आल्याने आमदार शिरीष चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नसीरखाँ हुसेनखाँ या विक्रेत्याच्या बेस्ट आम्लेट सेन्टरवर रविवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आर. आर. चौधरी यांनी छापा टाकून काही अंड्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे, तक्रारदार संग्राम पाटील, किरण गोसावी, दीपक मद्रासी उपस्थित होते. नसीरखाँ हे अंड्यांचे होलसेल विक्रेते आहेत. त्यांनी चौकशीत सदर अंडी धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथून आणल्याचे सांगितले. अन्न निरीक्षक चौधरी यांनी धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क करून याबाबत माहिती दिली व सदर चौकशी करावी अशी विनंती केली.दरम्यान, केशवनगर भागातील संग्राम पाटील यांनी बंगाली फाईल भागातील शिवतीर्थ महाजन यांच्या दुकानातून ७ फेब्रुवारी रोजी १२ अंडे घेतले होते. त्यांनी सदर अंडे उकळल्यानंतर ते कृत्रिम असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती, तसेच संग्राम पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्यापुढे सदर अंडे कृत्रिम असल्याचा प्रयोगच करून दाखवला होता. यानंतर आमदार चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क करून याबाबत तक्रार केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.दरम्यान, शहरात कृत्रिम अंडे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. अमळनेर शहरात तीन होलसेल विक्रेते आहेत. तर अंडापाव, आम्लेट विकणाºयांच्या शेकडो हातगाड्या आहेत. त्यात किराणा दुकानातूनही अंड्यांची नेहमी विक्री केली जाते. त्यामुळे अंडे खाणाºयांनी सावधानता बाळगणे महत्वाचे आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव