शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

दर दिवशी सूर्यनमस्कार घाला, तंदरुस्त रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 21:56 IST

धावपळीच्या आयुष्याला जणू वेगाची चाकं लागल्याने आरोग्याच्या अनेकविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यात 'फिट' राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. तळपायासून ते मस्तकापर्यंत तंत्रशुद्ध व्यायमाचे फायदे मात्र सूर्यनमस्कारापासूनच मिळतात. भारतीयांच्या एकूणच जीवन पद्धतीत सूर्यनमस्कार व्यायामाला मोठे महत्व आहे.

ठळक मुद्दे जागतिक सूर्यनमस्कार दिन विशेष तळपायापासून ते मस्तकापर्यंत होतो व्यायाममनाची एकाग्रता वाढते, पचनक्रियाही सुधारतेअनेक व्याधी होतात दूरपाऊण शतकापासून सूर्यनमस्कार

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : धावपळीच्या आयुष्याला जणू वेगाची चाकं लागल्याने आरोग्याच्या अनेकविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यात 'फिट' राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. तळपायासून ते मस्तकापर्यंत तंत्रशुद्ध व्यायमाचे फायदे मात्र सूर्यनमस्कारापासूनच मिळतात. भारतीयांच्या एकूणच जीवन पद्धतीत सूर्यनमस्कार व्यायामाला मोठे महत्व आहे. दरदिवशी सूर्यनमस्कार घातल्याने शरीर आणि मनाची एकाग्रता साधली जाते. म्हणूनच आजच्या जागतिक सूर्यनमस्कारदिनी ‘सूर्य नमस्काराचे’ महत्त्व अधिक प्रखरतेने अधोरेखित होते.मस्तकापासून तळपायापर्यंत सर्व विकार नष्ट करण्यासाठी सूर्यनमस्काराचा उपयोग केला जातो. आसने आणि प्राणायाम या दोन्हींचा अंतर्भाव असलेला हा व्यायाम प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. सूर्यनमस्काराची आवड निर्माण होण्यासाठी विविध संस्थांसह तरुणाईदेखील प्रयत्न करतांना दिसते.१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु, दैनंदिन जीवनात याचा सराव आवश्यक आहे. आजच्या आधुनिक युगात विकृती शास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शरीरातील सूक्ष्म दोष, रोगजंतूचे अचूक निदान उपलब्ध आहेत, पण रोगनिदानासाठी काहीवेळा उपचारापेक्षा जास्त खर्च येतो आणि यात मानवी मन, भाव, भावना याचा कोणताच विचार केला जात नाही. शिथीलीकरणाचे व्यायाम झाल्यावर आधी सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील ताठरपणा कमी होतो व आसनासाठी आवश्यक असलेला लवचिकपणा प्राप्त होतो.सूर्यनमस्कार हा सूर्योदय व सूर्यास्त या दोन्हीवेळी घातले जाऊ शकतात. प्रारंभी सूर्याकडे तोंड करून दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा करावी.सूर्यनमस्कार घालण्याच्या दोन पद्धतीसूर्यनमस्कार घालण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत १२ अंकात व दुसरे पद्धतीत १० अंकात घातले जाऊ शकतात. सूर्यनमस्कारामध्ये एकूण १० स्थिती असतात. प्रत्येक स्थितीत एक आसन समाविष्ट असते. म्हणजे पूर्ण सूर्यनमस्कारात १० आसने असतात. त्यामुळे त्या आसनामुळे शरीराला लाभ होतात. जसे पहिल्या स्थितीला प्रार्थना आसन, दुसऱ्या स्थितीला ताडासन, तिसºया स्थितीत उत्तानाअसन, चौथ्या स्थितीत एकपाद प्रसरणासन, पाचव्या स्थितीला चतुरंग दंडासन, सहाव्या स्थितीला अष्टांगआसन, सातव्या स्थितीला भुजंगआसन, आठव्या स्थितीला अधोमुख श्वासनासन, नवव्या स्थितीला एकपादप्रसरणासन, दहाव्या स्थितीला उत्तानासन असे संबोधतात.सूर्यनमस्काराचे फायदे -हृदय व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.सर्व महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा होतो. पाठीचा कणा, मणका आणि कंबर लवचिक होते. पचनक्रिया सुधारते.मनाची एकाग्रता वाढते.दैनंदिन उपक्रमात नियमितमुलांना होणारे फायदे :दररोज सूर्यनमस्कार केल्यास आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांची सहन करण्याची क्षमता वाढून त्याच्यात असणारी चिंता, अस्वस्थपणा कमी होण्यास मदत होते. परीक्षेच्या ताणतणावाच्या काळात, शरीराची ताकद वाढवण्यासाठी आणि अवयवांची लवचिकता वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार नियमित करणे फायदेशीर ठरते.सूर्यनमस्कार आणि अध्यात्मजानेवारी महिन्यातील मकरसंक्रांतीनंतर अर्थातच १४ जानेवारीनंतर रथसप्तमीचा कालावधी सुरू होतो. या काळात सूर्याची उष्मा दिवसागणिक अधिक प्रखर होते. या दिवसापासून सूर्याची उपासना केली जाते. रथसप्तमीचा दिवस म्हणजेच तेजोपासनेचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्याच्या किरणांतून निर्माण होणाºया तेज लहरी पृथ्वीच्या कक्षा पार करून जमिनीवर येतात. त्या अनुषंगाने सूर्य देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा करतात. सजीव सृष्टीच्या निर्मितीसाठी सूर्य हा महत्त्वाचा घटक मानला जातो. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसांत व्यायामास अधिक महत्त्व दिले जाते. सूर्यनमस्कार हा त्यातील व्यायामाचा एक भाग आहे.सूर्य नमस्कार करणे म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. सूर्य हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा निर्माता मानला जातो.कधी करावेत सूर्यनमस्कारसूर्यनमस्कार हे सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी केल्यास सर्वोत्तम असते. त्यावेळी मन हे प्रसन्न असल्याने दिवसाला सामोरे जाणे सोयीस्कर ठरते. दुपारी सूर्यनमस्कार केल्यास शरीरास त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत होते तर, सायंकाळी केल्यास शरीरास आराम मिळण्यास मदत होते. सूर्यनमस्कार वेगाने केल्यास हृदयाचे जीवन वाढते आणि वजन घटण्यास मदत होते.सूर्यनमसकर केल्याने मनास शांती मिळते.सूर्यनमस्कार कोणती काळजी घ्याल- सूर्यनमस्कार आणि योगसाधना करण्यासाठी निवडलेल्या जागेत शक्यतो बदल करू नये. ती जागा स्वच्छ आणि हवेशीर असावी.- सूर्यनमस्कार, योगा करण्यासाठी शक्यतो सकाळी ६ ते ७ ची वेळ निवडावी. ती वेळ एकदा निश्चित झाल्यास त्यात पुन्हा पुन्हा बदल करू नये.- सूर्यनमस्काराचा अभ्यास किंवा व्यायाम करताना जमिनीवर काहीतरी आच्छादन घालूनच करावे. व्यायाम करताना सैल कपडे घातल्यास अधिक सोयीस्कर ठरू शकते. तसेच शरीराच्या अवयवांच्या हालचाली सर्व दिशांना मोकळेपणाने करता याव्यात यासाठी योग्य पोशाख असावा.- सर्व वयोगटांतील व्यक्तींना सूर्यनमस्कार आणि योग साधना करण्यासारखे जरी असले तरी, व्याधित, दुर्बल आदी व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे व्यायाम प्रकार करावे.- सूर्यनमस्कार करताना ते सकाळी उपाशीपोटीच करावे. सूर्यनमस्कार करण्यापूर्वी साडेतीन तासांपर्यंत जड आहार व अर्धा ते पाऊण तास द्रव आहार घेऊ नये. तसेच धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसने कटाक्षाने टाळली पाहिजेत.- सूर्यनमस्कार करत असताना श्वसनाची क्रिया ही नाकानेच करावी, तोंडाने करू नये. सूर्यनमस्कार करताना ते सावकास, संथ गतीने श्वासावर योग्य ते नियंत्रण ठेवून करावेत.-सूर्यनमस्कार आणि योगा करण्यापूर्वी पोटभर जेवण करू नये. जर जेवण झाले असल्यास २ ते ३ तासानंतर व्यायाम करावा.-योगा आणि सूर्यनमस्कार केल्यानंतर ३० मिनिटांनी पाणी प्यावे.- कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास आणि फ्रॅक्चर झाले असेल तर तज्ज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच योगा आणि सूर्यनमस्कार करावे.- योगा आणि सूर्यमस्कार झाल्यावर कोणतेही श्रमाचे काम किंवा व्यायाम प्रकार करू नये.- आठ वर्षाखालील मुलांनी सूर्यनमस्कार आणि योगसाधना मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार करावे.गेल्या ४५ वर्षापासून योगाचे मोफत वर्ग घेतोय. स्वत: पाऊण शतकापासून नियमितपणे १३ सूर्यनमस्कार करतोय. विश्वाच्या पटलावर परिपूर्ण व सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराचे अन्ययसाधारण महत्व आहे.-वसंतराव चंद्रात्रे, योगाचार्य, चाळीसगावसूर्यनमस्कार असा एकमेव व्यायाम आहे. ज्यात संपूर्ण शरीर आणि सांधे यांचा व्यायाम होतो. या प्रकारात पोटातल्या अवयवांवर दाब त्यांची क्रयशक्ती सुधारते. सूर्यनमस्कार नियमित करण्याने आपण अनेक व्याधी दूर ठेवू शकतो. त्यामुळे हे नियमित करणे अपेक्षित आहे.- डॉ.समीर धाकड, आयुर्वेदाचार्य, चाळीसगाव

टॅग्स :Healthआरोग्यChalisgaonचाळीसगाव