दोन तालुक्यांमध्ये ॲक्टिव्ह रुग्ण अजूनही हजाराच्या पुढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:17 AM2021-05-13T04:17:04+5:302021-05-13T04:17:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात जळगाव शहरात उपचार घेत असलेले रुग्ण १३९१ आणि ग्रामीणमध्ये ३७१ रुग्ण आहेत, तर ...

Active patients in two talukas are still in the thousands | दोन तालुक्यांमध्ये ॲक्टिव्ह रुग्ण अजूनही हजाराच्या पुढेच

दोन तालुक्यांमध्ये ॲक्टिव्ह रुग्ण अजूनही हजाराच्या पुढेच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात जळगाव शहरात उपचार घेत असलेले रुग्ण १३९१ आणि ग्रामीणमध्ये ३७१ रुग्ण आहेत, तर भुसावळ तालुक्यात १२५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे दोन तालुके वगळता जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या ही ९०० च्या आतच आहेत. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात नवे ८४९ रुग्ण आढळून आले आहेत, तर ८४७ जण बरे झाले आहेत. ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपचार घेतलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ९८९४ एवढी आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर रुग्ण आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या मात्र कमी झाली आहे. बु‌धवारी जळगाव शहरात ८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १६२ जण बरे होऊन घरी गेले आहेत. बुधवारी भुसावळ तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढली. दिवसभरात १६३ नवे बाधित आढळले, तर फक्त ७५ जण बरे होऊन घरी गेले. मुक्ताईनगर तालुक्यात देखील १७१ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात सर्वांत जास्त रुग्ण हे मुक्ताईनगरला आहेत. तेथे फक्त ५४ जण बरे झाले आहेत. त्याशिवाय चोपड्यात ४१, जामनेरला ६१, रावेरला ५२ नवे बाधित आढळून आले आहेत.

जीएमसीत आतापर्यंत ८९९ जणांचा कोरोनाने बळी

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यासोबतच एकूण २३७४ कोरोना बळी झाले आहेत. त्यातील ८९९ जणांचा मृत्यू हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झाला आहे. त्यासोबतच बुधवारी सारी, कोविड निगेटिव्ह, न्यूमोनिया, कोविड सस्पेक्ट आणि पोस्ट कोविड आजारांमुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Active patients in two talukas are still in the thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.