८ तालुक्यात कोरोना शून्य
जळगाव : गुरुवारी जिल्ह्यातील ८ तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. यात चोपडा, पाचोरा, भडगाव, धरणगाव, यावल, एरंडोल, जामनेर, बोदवड या तालुक्यांचा समावेश आहे. तर जळगाव शहरासह ७ तालुक्यात कमी अधिक रुग्ण समोर आले आहेत.
तीन दिवस प्रशिक्षण
जळगाव : मुलांचे संरक्षण या मुद्द्यावर यशदातर्फे १ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात महिला बालकल्याण विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह अन्य मोजक्या विभागप्रमुखांचा समावेश असेल.
सभेचे नियोजन
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या सभेसाठी जिल्हा परिषदेत प्रमुख अधिकाऱ्यांनी गुरूवारी नियोजन केले आहे. २९ रोजी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे नियोजनही मांडण्यात येणार आहे. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागून आहे.