आॅनलाईन लोकमतअमळनेर , दि.२७ - विद्यार्थी नसतानाही प्रताप महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया तीन तरुणांवर अमळनेर पोलिसांनी बुधवारी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली.प्रताप महाविद्यालयात स्नेहसंमेलन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घातला व त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. कॉलेजची विद्यार्थी नसलेले तरुण कार्यक्रमात गोंधळ घालत असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्याकडे करण्यात आली. वाघ यांनी शोध पथकाचे पोलीस प्रमोद बागडे, किशोर पाटील, सुनील पाटील, बापू साळुंखे यांना घटनास्थळी पाठविले. कर्मचाºयांंनी केलेल्या चौकशीदरम्यान विठ्ठल प्रवीण पाटील, पराग भास्कर महाजन , प्रकाश लक्ष्मण महाजन या तिघा तरुणांकडे ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी या तिघांवर मुंबई पोलीस कायदा ११० , ११५ प्रमाणे कारवाई केली.दरम्यान, शहरात मंगलमूर्ती चौक, शिवाजी बगीचा यासह महाविद्यालय व कन्या शाळांच्या रस्त्यावर काही टवाळखोर तरुण मुलींची छेड काढत असल्याने त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केली आहे.
स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया अमळनेरातील तरुणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:04 IST
विद्यार्थी नसतानाही प्रताप महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया तीन तरुणांवर अमळनेर पोलिसांनी बुधवारी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली.
स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया अमळनेरातील तरुणांवर कारवाई
ठळक मुद्देप्रताप महाविद्यालयात स्नेहसंमेलन सुरु असताना झाला गोंधळगोंधळ घालणाºया तरूणांची केली पोलिसांकडे तक्रारतरुणींची छेड काढणाºयांचा बंदोबस्त करण्याची मागणी