वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया १२ व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई केली. यामुळे अशा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरातील व्यावसायिक व फेरीवाले प्लॅस्टिक पिशव्याचा वापर करीत असल्याचे पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने शुक्रवारी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणारे व्यावसायिक तसेच फेरीवाले अशा १२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सात हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच संबंधितांकडे असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.यापुढे बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या वापरणाºया व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासाठी शहरातील व्यावसायिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले.
वरणगाव येथे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:15 IST
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया १२ व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई केली. यामुळे अशा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वरणगाव येथे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई
ठळक मुद्दे१२ व्यावसायिकांना आकारला सात हजार रुपये दंडयापुढे प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन