शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे - जळगावात निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:24 IST

काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

जळगाव : सहकारी वरिष्ठ डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या करणाºया डॉ. पायल तडवीला न्याय मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी दुपारी जळगावात काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.शहरातील शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, डॉ. पायल तडवी यांना मागासवर्ग जागेवर प्रवेश मिळालेला होता. तिला जातीवाचक बोलणे, आर्थिक कुवत नसताना केवळ मागास असल्याने प्रवेश मिळाल्याने अपमानास्पद बोलणे, अशा अनेक प्रकारे धमक्या देत वरिष्ठ डॉक्टरांनी रॅगिंग करीत तिचा छळ केला होता. अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.डॉ. पायल तडवी यांची आत्महत्या संशयास्पद असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचाही आरोप कुटुंबियांनी केला आहे. आत्महत्येस आठ दिवस उलटूनही ठोस कारवाई होत नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर अ‍ॅट्रॉसिटी व रॅगिंग विरोधी कायदा अंतर्गत त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या घटनेचा जळगाव जिल्हा महानगर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, डॉ.अर्जुन भंगाळे, देवेंद्र मराठे उपस्थित होते. निवेदनावर जळगाव ग्रामीणचे तालुकाध्यक्ष श्याम तायडे,अविनाश भालेराव, भगतसिंग पाटील, सुरेश पाटील,अजबराव पाटील,चोपडा शहराध्यक्ष के.डी. चौधरी, संजीव बाविस्कर आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव