शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ताडीसह देशी-विदेशी दारु विक्रेत्यांना कारवाईची किक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2023 15:24 IST

जळगाव, पाचोरा, चोपड्यात ‘एक्साईज’च्या धाडी, अवैधपणे हा साठा विक्री करणाऱ्या १४ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटकही केली आहे.

कुंदन पाटील

जळगाव : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून १४ जणांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

३१ डिसेंबरनिमित्त बनावटसह अवैधपणे मोठ्या प्रमाणावर दारुची विक्री होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता दाखवित शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत कारवाई सत्र राबविले. त्यात पाचोरा, चोपडा, जळगाव परिसरातून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दारुसह ताडीचे ‘पाऊच’ही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहेत. अवैधपणे हा साठा विक्री करणाऱ्या १४ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटकही केली आहे.

चौघा तळीरामांना दंडाची झिंगदरम्यान, तरसोद शिवारातील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करणाऱ्या ४ जणांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित राजेंद्र चव्हाण, नवल अजयपाल जाधव, अक्षय संजय चव्हाण, प्रशांत दत्तू पाटील (जळगाव) अशी चौघांची नावे आहेत. 

‘ताडी’चा प्रवास रोखलाएका कारने ताडीने भरलेले ‘पाऊच’ वाहून नेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १०० पाऊचसह वाहन जप्त करण्यात आले आहे.

एरंडोलमध्येही कारवाईजळगाव, पाचोरा, चोपडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी एरंडोल तालुक्यातील अवैध मद्यविक्री करणाऱ्या व विनापरवाना दारूच्या दारु पिणाऱ्या १७ आरोपींवर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली. १२ मदयपींना ४ गुन्हयांमध्ये एरंडोल येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 300 रुपयांचा दंड ठोठावला.

महामार्गावर तपासणीराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शुक्रवारी रात्री महामार्गावर वाहनांची अचानक तपासणी सुरु केली. रात्रभरात कुठेही दारुची तस्करी करणारे वाहन आढळून आलेले नाही.