शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण कारवाईत सातत्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:07 IST

अजय पाटीलमनपाने मंगळवारपासून शहरात विशेष अतिक्रमण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.मनपा प्रशासनाने पाच महिन्यांपुर्वी देखील शहरात विशेष अतिक्रमण मोहिम राबविली होती. मात्र, शहरात पून्हा नो हॉकर्स झोन मध्ये सारखीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मनपाला पुन्हा विशेष मोहीम राबवावी लागत आहे. मनपा प्रशासनाकडे अतिक्रमण कारवाईबाबत सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणाची ...

अजय पाटीलमनपाने मंगळवारपासून शहरात विशेष अतिक्रमण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.मनपा प्रशासनाने पाच महिन्यांपुर्वी देखील शहरात विशेष अतिक्रमण मोहिम राबविली होती. मात्र, शहरात पून्हा नो हॉकर्स झोन मध्ये सारखीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मनपाला पुन्हा विशेष मोहीम राबवावी लागत आहे. मनपा प्रशासनाकडे अतिक्रमण कारवाईबाबत सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणाची समस्या ही केवळ एका विशेष मोहीमेनंतर संपू शकत नाही. त्यासाठी सातत्य असणे गरजेचे आहे. अधिकारी किंवा आयुक्तांच्या सूचनानंतरच ही मोहीम राबविली जाते. तो पर्यंत शहरातील प्रत्येक भागात अतिक्रमणाचा विळखा वाढलेला असतो. दरम्यान, हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांचा वाद दिवसेंदिवस वाढत जात असून, प्रत्येक अतिक्रमण निर्मुलन मोहीमेदरम्यान वाद निर्माण होत आहे. यामध्ये हॉकर्सचा हट्ट देखील कारणीभूत ठरत आहे. महापालिकेने हॉकर्सला ख्वॉजामिया चौक परिसरात व्यवसाय करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, त्या ठिंकाणी व्यवसाय करण्यास हॉकर्सचा नकार आहे. त्या जागेवर जात नसल्याने त्यांच्याकडून ‘नो हॉकर्स’ झोनमध्येच व्यवसाय सुरु आहे. यामुळे मनपा कर्मचाºयांशी खटके उडत आहेत. गोलाणी मार्केटमधील ग्राउंड फ्लोवर देखील हॉकर्सला व्यवसाय करण्याची जागा मनपाने दिली आहे. मात्र, त्या ठिंकाणी लकी ड्रॉ काढून ती प्रक्रिया देखील बारगळली आहे. दरम्यान मनपाकडून अतिक्रमण मोहिम सुरु झाल्यानंतर अनेकदा राजकीय दबाव देखील अधिकाºयांवर वाढत जात असतो. त्यामुळे अनेकदा कारवाईस देखील अडथळा येतो. त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या मनपा महासभेत नगरसेवक अनंत जोशी यांनी थेट उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांच्यावर हप्ते घेत असल्याचा आरोप केला होता. यामुळे देखील अतिक्रमण कारवाईबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. या आरोपानंतर कहार यांनी महात्मा फुले मार्केटमधील हॉकर्सवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी देखील करुन घेतली. ही तत्परता एखाद्या नगरसेवकाने आरोप लावल्यानंतर दाखविण्यापेक्षा कायम दाखविली तर नगरसेवकांना अधिकाºयांवर आरोप लावण्याची जागा देखील शिल्लक राहू द्यायला नको, अशी कारवाई मनपा प्रशासनाने करण्याची गरज आहे.शहरातील अतिक्रमणाप्रमाणेच राष्टÑीय महामार्ग परिसरात देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. समांतर रस्त्यांचे काम देखील रखडले आहे. महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याबाबत मनपा कडून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांना बैठकीसाठी वेळ मागून देखील वेळ मिळत नसल्याने ही कारवाई देखील रखडली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव