शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 15:23 IST

भुसावळ : शहरांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल ३३१ ट्रिपल सीट दुचाकी चालवून नियमभंग करणाऱ्याकडून तब्बल ६६ ...

ठळक मुद्दे६६ हजार दंड तरीही ट्रिपल सीट जोरातकारवाई यापुढेही सुरूच राहणार

भुसावळ : शहरांमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल ३३१ ट्रिपल सीट दुचाकी चालवून नियमभंग करणाऱ्याकडून तब्बल ६६ हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. इतका दंड वसूल जरी केला असला तरी ट्रिपल सेट शहरात अजूनही जोरातच असल्याचे चित्र दिसत आहे.शहरातील गांधी पुतळा, बस स्टँड चौक, डॉ.आंबेडकर पुतळा चौक, नाहाटा चौक, पांडुरंग चौक, अष्टभूजा चौक हे मुख्य चौक असून या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असताना दिसत असते. वाहतूक शाखेकडून सातत्याने दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यातल्या त्यात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये ३३१ ट्रिपल सीट वाहनचालकांनी नियमभंग केले. त्यांच्याकडून वाहतूक शाखेतर्फे ६६ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. फक्त ऑक्टोबर महिन्यात तब्बल ४७ ट्रिपल सीट वाहनचालकांवर केसेस झाल्या. त्यांच्याकडून ९ हजार ४०० इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.वाहतूक शाखेतर्फे सातत्याने ठिकठिकाणी पथक लावून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतूक शाखेतर्फे रिक्षा स्टॉप सोडून मध्येच रस्त्यावर रिक्षा लावणाऱ्या वर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आता वाहतूक शाखेच्या रडारवर ट्रिपल सीट चालक असल्याचे दिसून येत आहे.गांधी पुतळा ठिकाणी सर्वात जास्त केसेसजळगाव व यावल रोड ला जोडणाऱ्या गांधी पुतळा या ठिकाणी सर्वाधिक ९० ट्रिपल सीट चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे."प्रत्येक वाहनचालकाने शासनाने दिलेल्या वाहनाचे नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. वाहन चालवत असताना अनेक वेळा वाहनाचे बॅलन्स बिघडते. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते व अनेक वेळा अशातून प्राणही गमवावा लागतो. ट्रिपल सीट वाहन चालवताना यापुढेही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.-संदीप आराक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, भुसावळ 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीBhusawalभुसावळ