शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

पाचोरा तालुक्यात बारावीच्या परीक्षेत २८ विद्यार्थ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:54 IST

बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपाचोऱ्यातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा परीक्षा केंद्रांचा समावेशबैठे पथकांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्चचिन्ह

पाचोरा, जि.जळगाव : बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना आढळलेल्या २८ विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने सोमवारी कारवाई केली. यात पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय आणि कासमपुरा, ता.पाचोरा येथील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.सोमवारी बारावीच्या विज्ञान शाखा भौतिकशास्त्र या विषयाचा पेपर होता. पाचोरा शहरातील एम.एम. महाविद्यालय परीक्षा केंद्रास जळगाव डायटचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांच्या भरारी पथकाने अचानक भेट दिली. तेव्हा विद्यार्थ्यांजवळ कॉप्या आढळल्या. त्यात १५ विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केली.सदर भरारी पथक कासमपुरा मार्गे जळगाव जात असताना कासमपुरा, ता.पाचोरा या परीक्षा केंद्रातही १३ विद्यार्थ्यांवर कारवाई केली.डायट प्राचार्य डॉ.गजानन पाटिल यांच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. एम.एम.महाविद्यालयात १४ विद्यार्थी विज्ञान शाखेचे तर एक विद्यार्थी कॉमर्स शाखेचा होता. पाचोरा तालुक्यात एकूण चार परीक्षा केंद्रे असून, या केंद्रांवर बैठ्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र भरारी पथकाच्या या कारवाईमुळे स्थानिक अधिकारी व बैठे पथकाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :examपरीक्षाPachoraपाचोरा