शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खुनातील आरोपीने कपडे काढून मांडला जळगाव ‘सिव्हील हॉस्पिटल’ मध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:26 IST

उपचार व तपासणीची सुविधा नसल्याने संताप

जळगाव : घशातील त्रासामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असताना ती सुविधा येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नसल्याने खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या सचिन गुमानसिंग जाधव (४१) याने अंगातील शर्ट काढून रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस व रुग्णालयातील डॉक्टरांना चांगलाच घाम फुटला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव, आसिफ बेग असलम बेग (२३) व मनिष भागवत मोरे हे तिघं जण कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात आहेत. या तिघांना पोलिसांनी कारागृहातून गुरुवारी सकाळी शासकीय रुग्णालयात आणले.सचिन याच्या घशात त्रास असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, त्यासाठी तपासणीचे यंत्र या रुग्णालयात नाही, त्यामुळे औरंगाबाद किंवा मुंबई, पुणे येथेच त्याच्यावर उपचार करावे लागणार आहेत. येथे आणूनही तपासणी होत नसल्याने सचिन याने संताप व्यक्त केला. रूग्णालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दाराबाहेर ठिय्या मांडला. यावेळी त्याने अंगावरील शर्ट व पॅँटही काढून फेकले.आमच्याकडे कोणी चांगल्या नजरेने बघत नाहीतआसिफ बेग असलम बेग (२३) हा त्वचेच्या आजाराने ग्रस्त आहे. हा आजार नियंत्रणात येण्याऐवजी वाढत आहे. मी काय यातना भोगतोय हे मलाच माहीत. आम्ही कैदी असलो तरी शेवटी माणसे आहेत. परंतु आमच्याकडे कोणी चांगल्या नजरेने बघत नाहीत असे सांगत आसिफ याने संताप व्यक्त केला. तपासणी व उपचार होऊ न शकल्याने पुन्हा आम्हाला उपचारासाठी आणले जाणार का? हे आम्हीही सांगू शकत नाही. कारण कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान असून आजारी रूग्णांना रूग्णालयात लवकर आणले जात नाही, त्यामुळे आम्हाला अशाच यातना सहनच कराव्या लागतात, असे सांगून तिघांना ठाण मांडले. पोलिसांनी त्यांची समजूत घातली.पोलिसांनी कक्ष क्रमांक एकमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सचिन जाधव याला नेले. त्यांनी कारागृह रजिष्टरमध्ये या तिघांना रुग्णालयात हजर करावे,असे नमूद केले. घशात त्रास होत असल्याने उपचार व निदान करण्यात यावे, असे पत्र बंदीवान सचिन याने जिल्हा सत्र न्यायाधीश यांना दिले होते. त्यांनी या पत्राची दखल घेऊन तात्काळ बंदीवानाला उपचारासाठी रूग्णालयात न्यावे,असे आदेश केले होते,त्यानुसार त्याला रूग्णालयात पोलिसांनी हजर केले होते.परंतु तरीही त्याच्यावर वेळेअभावी उपचार होऊ शकले नाहीत.वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने आजारी कैद्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला वैतागलेल्या कैद्याने तर थेट कपडे काढूनच रुग्णालयाच्या आवारात ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

टॅग्स :Jalgaonजळगाव