शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात -डॉ.संतोष बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 15:13 IST

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपी डॉ.संतोष बोराडे यांनी केले

भुसावळ, जि.जळगाव : संगीताचे नानाविध प्रकार आहेत. बालपणापासून तर मोठे होण्यापर्यंत आपण विविध गीतांमधून संगीताचे ऐकले आह.े आनंद, राग, भावना व्यक्त करण्यासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे. मन मोकळे करण्यासाठी संगीताचा वापर केल्यास आपल्यावर आलेला ताणतणाव निश्चितपणे दूर करता येऊ शकतो व माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपी डॉ.संतोष बोराडे यांनी केलेरोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ आयोजित द्वंद जीवनाचे या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प आॅनलाइन गुंफण्यात आले. प्रास्ताविक प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी केले.डॉ. बोराडे पुढे म्हणाले, आपली प्रकृती सुदृढ असताना संगीत ऐकणे गरजेचे आहे. यामुळे आपली प्रबोधन आध्यात्मिक शक्ती वाढते. स्वत:मधील गुण विकसित करता येतात. प्रत्यक्ष तत्त्वज्ञानाची अंमलबजावणी केली पाहिजे. विद्यार्थी चांगला माणूस म्हणून तयार होण्याची क्षमता संगीतामध्ये आहे. संगीत ऐकताना आपण काय ऐकले पाहिजे याचा स्वत:ला प्रश्न विचारला पाहिज.े वाद्य वाजवणे म्हणजे संगीत नाही. आईचे अंगाई गीत, आपण म्हटलेली कविता आपल्याला आवडली हे गाणे पारंपरिक लोकगीते हेसुद्धा संगीतच आहे. आपल्या आयुष्यातील संगीत आपण शोधले पाहिजे. संगीतामधून माणसाला चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची शक्ती मिळते. तो घाबरून न जाता त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहतो. संगीतामधून विष व अमृत दोन्ही तयार होते पण आपल्याला काय घ्यायचे हे आपल्यावर ती अवलंबून असते. गर्भावस्थेपासून आपण संगीत ऐकू शकतो. संगीत म्हणजे नुसते वाद्य नसून पारंपरिक गीते सुद्धा यांचा समावेश होतो.आपल्या अंगी असलेल्या भावभावनांना आळाफाटा देऊ नका. रडावेसे वाटले रडा, हसावेसे वाटले तर हसा. राग व्यक्त करावासा वाटला तर राग व्यक्त करा. आईच्या अंगाई गीतांमधून आई-वडिलांच्या स्नेहप्रेमातून आपल्या शरीरामध्ये विविध विकार श्रवतात. यामुळे कोणत्याही भावनांना न भिता आणि व्यक्त करण्याची सवय लावा.सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी, तर आभार योगेश इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब आॅफ सांगलीचे प्रेसिडेंट सुधाकर सनांसे, प्रोजेक्ट वॉटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :musicसंगीतBhusawalभुसावळ