शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदगाव येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

जळगाव : तालुक्यातील विदगाव येथून १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रकार सोमवारी दुपारी साडे तीन वाजता घडला. याप्रकरणी मंगळवारी ...

जळगाव : तालुक्यातील विदगाव येथून १६ वर्षीय मुलीला पळवून नेण्याचा प्रकार सोमवारी दुपारी साडे तीन वाजता घडला. याप्रकरणी मंगळवारी तालुका पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार संजय चौधरी करीत आहेत.

गणेशपुरीत महिलेला मारहाण

जळगाव : नातेवाईक समोरच्याच्या ओट्यावर बसल्याच्या कारणावरुन अनिता किरण सपकाळे (२२) या महिलेला शोभाबाई रमेश सपकाळे, तिची मुलगी व नात या तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी गणेशपुरीत घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभाबाई हिने अनिता हिच्या पतीविषयी देखील वाईट शब्द वापरला होता. तपास प्रदीप पाटील करीत आहेत.

अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार

जळगाव : खोटे नगर परिसरातील हॉटेल राधिका समोर रोहन शालीक बाविस्कर (१७,रा.तुकारामवाडी) याच्यावर पियुष मुकुंदा ठाकूर व हर्षल गजानन ठाकूर या दोघांनी धारदार शस्त्राने वार केला.हातावर तसेच कमरेत वार झाल्याने हा तरुण जखमी झाला आहे. मागील भांडणाच्या कारणावरुन ही घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजाराम नगरातील वृध्दाचा मृत्यू

जळगाव : राजाराम नगरातील मधुकर उर्फ प्रेमराज वना शिंदे (५७) यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सोमवारी नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी मंगळवारी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार लालसिंग पाटील करीत आहेत.

अनोळखी वृध्दाचा मृत्यू

जळगाव : जैन इरिगेशनच्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या अनोळखी ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ४ मार्च रोजी त्यांना दाखल करण्यात आले होते.तपास हवालदार नसीन तडवी करीत आहेत.