शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 01:28 IST

आवाहन

जळगाव :   कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेतू हे ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये कोरोना विषाणू अनुषंगाने सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणू बाधितांच्या ट्रेसिंगसाठी महत्वाचे ॲप असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषत: स्मार्टफोन धारकांनी हे ॲप डाऊनलोड करावे,  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.या ॲपद्वारे ॲप डाउनलोड करणारा व्यक्ती कोरोना बाधित असलेल्या किती लोकांच्या संपर्कात आला या विषयाची माहिती मिळेल. तसेच ॲप डाऊनलोड करणाऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला तर या व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले याची सर्व माहिती या ॲपद्वारे मिळते. हे ॲप सुरुवातीला डाऊनलोड करणाऱ्याचे आरोग्यविषयक तपासणी करते. आरोग्य विषयक विशेषत: कोरोना विषयक काही प्रश्न विचारले जातात त्याच्या उत्तरांना आपल्याला चूक की बरोबर उत्तरावर टिक करावे लागते. तसेच ॲपमध्ये सामाजिक अंतर कशा पद्धतीने ठेवायचे, हात कशा पद्धतीने धुवायचे, तोंडावर रुमाल कशा पद्धतीने लावायचा याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.  हे ॲप प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करता येते.आरोग्य सेतू हे ॲप कोरोना प्रतिबंधासाठी व ट्रेसिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तरी याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन  डॉ.ढाकणे यांनी केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव