शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा तरुण ठरला सेक्सटॉर्शनचा बळी, अश्लिल व्हिडीओकॉल व्हायरल करण्याची धमकी

By सुनील पाटील | Updated: October 11, 2022 15:40 IST

रेकॉर्डींग व फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जळगाव : शहरातील ४० वर्षीय तरुणाला तरुणीने व्हिडीओकॉलवर अश्लिल कृत्य करुन त्याचे रेकॉर्डींग करुन घेतलं. तसंच हे रेकॉर्डींग व फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेक्सटॉर्शनचा हा प्रकार असून गेल्या सात महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, खासगी नोकरी करणाऱ्या या तरुणाला ८ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी महिलेने फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून या तरुणाशी मेसेंजरवर संवाद साधला. त्यानंतर तरुणाचा व्हाटसॲप नंबर मिळविला. त्यानंतर या तरुणाला एकांतात जाऊन कपडे काढायला लावले. दोघांचे अश्लिल व्हिडीओ रेकॉर्डींग करुन ही रेकॉर्डींग सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी दिली.

बदनामी होऊ द्यायची नसेल तर २० हजार रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या या तरुणाने दोन दिवस कुठेच वाच्यता केली नाही. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी रात्री अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव