शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी आठवडाभराचा अल्टीमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 17:40 IST

विमा कंपनीने केळीची प्रलंबित नुकसान भरपाई तात्काळ द्यावी

कुंदन पाटील

जळगाव : केळी पिक विम्याची मदत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबरोबरच पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या केळी व इतर पीक क्षेत्रांची स्थळ पाहणी करून एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्यात यावेत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत. 

केळी पीक विमा प्रलंबित नुकसान भरपाई, मागील आठवड्यात झालेले नुकसान या विषयावर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे व विमा कंपनींच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

विमा कंपनीची जबाबदारी

मागील आर्थिक वर्षात केळी विमा काढला होता मात्र अद्याप नुकसानी भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. विमा कंपनीने या कामात हलगर्जीपणा करू नये. शेतकऱ्यांना आठवड्याभरात नुकसान भरपाई त्यांच्या बॅंक खात्यात थेट वर्ग करावी.‌ विमा कंपनीच्या कामावर जिल्हाधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे. अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

आठ तालुक्यात नुकसान

तापी नदीला आलेला पूर व हतनूर बॅकवॉटरमुळे जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, बोदवड, चोपडा व जळगाव तालुक्यातील काही भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या केळी व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागात महसूल‌ व कृषी यंत्रणा तात्काळ सक्रीय करण्यात यावी. तलाठी व कृषी सहायकांनी मुख्यालय सोडून न जाता एका आठवड्याच्या आत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.