शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी बसवर धडकली, दोन तरुण जागीच ठार

By संजय पाटील | Updated: September 23, 2022 20:51 IST

हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली. 

अमळनेर जि. जळगाव  : शिरपूरकडून येणाऱ्या बसने दुसऱ्या बसला ओव्हरटेक केल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले.  ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पांझरा नदी पुलाजवळ घडली. महेंद्र शांतीलाल बोरसे (३९, रा.पाडसे ता. अमळनेर)  व अरुण उर्फ शंकर नथ्थू साळुंखे (३८, रा. हिंगोणे खुर्द प्र. जळोद ता. अमळनेर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही वैद्यकीय व्यवसाय करीत होते, अशी माहिती मिळाली. 

शुक्रवारी दुपारी शिरपूर -अमळनेर ही बस पांझरा नदी पूल ओलांडून अमळनेर हद्दीत आली होती. त्याचवेळी एका हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसली.  यात दुचाकीवरील महेंद्र बोरसे व अरुण साळुंखे  यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.  महेंद्र हा अमळनेर येथे भाड्याने राहत होता.  मोंढाळे, बहादरपूर (ता. पारोळा) येथे त्याचा दवाखाना होता.  त्याच्या पश्चात आई, वडील,भाऊ ,पत्नी व मुलगा असा परिवार आहे. अरुण हा बांभोरी (ता. धरणगाव) येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होता. त्याच्या पश्चात वडील,भाऊ ,पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. याबाबत बसचालकाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :AmalnerअमळनेरAccidentअपघात