शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी

By अमित महाबळ | Updated: October 4, 2022 18:21 IST

जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी मिळणार आहे. 

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी वयोमानानुसार होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाणार असून, बाह्य रुग्ण विभागातील कक्ष क्रमांक १०८ मध्ये ही सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे विशिष्ठ वय उलटून गेले असेल, तर त्यांना केस पेपरचा खर्चही लागणार नाही.  

ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळून येणारे रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, गुडघेदुखी, मोतीबिंदू हाडांचे विकार, दुर्धर आजार, तसेच डोळे-कान-नाक-घसा आदींची तपासणी ओपीडीत करून मिळणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली. वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या वृद्धांनी आधारकार्ड दाखवल्यास त्यांना केस पेपरचे शुल्क द्यावे लागत नाही. 

औषध मिळणार मोफत रुग्णांची तपासणी झाल्यानंतर बाह्यरुग्ण विभागात मोफत औषधे देण्यात येणार आहेत. राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अशा प्रकारची ओपीडी आहे. त्या धर्तीवर जळगावमध्येही सुरू करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार, कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 

तपासणी सुटसुटीत पद्धतीने करणे शक्यज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या सातत्याने भेडसावत असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपीडी झाल्याने तपासणी सुटसुटीत पद्धतीने करता येणार आहे. ज्येष्ठांसाठी सर्वांगीण आरोग्यसेवा देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे, अशी माहिती जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

 

टॅग्स :Jalgaonजळगावhospitalहॉस्पिटलSenior Citizenज्येष्ठ नागरिक