शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीदाराकडे मागितली चार कोटींची खंडणी, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा 

By विजय.सैतवाल | Updated: November 18, 2023 14:43 IST

चव्हाण यांच्या मुलाचाही समावेश : जळगाव व चाळीसगावातील गुन्ह्याप्रकरणातील साक्षीदाराला धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार तेजस रवींद्र मोरे (३४, रा. जिल्हा परिषद कॉलनी जळगाव) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पूत्र व अन्य तीन अशा पाच जणांविरुद्ध जळगावातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेले ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात या पूर्वीच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तेजस मोरे हे साक्षीदार असून त्यात त्यांचा जबाबदेखील झाला आहे. ही बाब ॲड. चव्हाण यांना माहित झाल्यानंतर मोरे यांनी साक्ष देऊ नये, यासाठी त्यांना तीन जणांमार्फत समजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मोरे त्यास तयार झाले नाही. त्यामुळे दीड ते दोन महिन्यांपूर्वी मोरे मुंबई ते पुणे प्रवास करीत असताना त्यांचे वाहन अडवून तुला जीवंत सोडणार नाही म्हणजे साक्ष फिरवण्याचा प्रश्नच राहणार नाही, अशी तिघांनी धमकी दिली. त्या वेळी एकटे असल्याने मोरे यांनी सहमती दर्शविली. तरीदेखील तुला जिवंत रहायचे असेल तर ॲड. चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशीही धमकी दिली. 

त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी मोरे हे रात्री जळगावातील घरासमोर शतपावली करीत असताना चार जण त्यांच्याजवळ आले व चार कोटी आताच दे, नाही तर तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. मोरे यांनी आरडाओरड केली असता चौघेजण पळून गेले. त्यानंतर त्यांच्या मित्रामार्फत मोरे यांना समजले की, ॲड. चव्हाण समोर न येता त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून तीन जणांना हाताशी धरून धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा प्लॅन केला आहे. 

त्यामुळे ही मंडळी जिवानिशी मारुन टाकतील, असे वाटू लागल्याने मोरे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, त्यांचा मुलगा व धमकी देणारे तीन जण अशा पाच जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३८७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी