शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्याला पाच लाखाचा गंडा

By विजय.सैतवाल | Updated: July 1, 2024 00:29 IST

वकीलपूत्रांची फसवणूक : सुरुवातीला तीन हजार रुपये पाठवून जिंकला विश्वास

जळगाव : टास्क पूर्ण करून ‘पार्टटाईम कमाई’चे अमिष दाखवित जळगावातील पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची चार लाख ८९ हजार ४०० रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. १४ एप्रिल ते २८ मेदरम्यान ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विद्यार्थ्याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या विद्यार्थ्याची आई वकील आहे तर वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे.जळगाव येथे राहणारा २३ वर्षीय तरुण एम.ए.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. १४ एप्रिल रोजी त्याला एका अनोळखी क्रमांकावरुन अमर्या पटेल नावाच्या तरुणीचा मॅसेज आला. तिने या तरुणाला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकतात. त्यासाठी आमच्या कंपनीचे टास्क पूर्ण केले तर तुम्ही दररोज दोन ते १० हजार रुपये कमवू शकतात. त्यानंतर तरुणाला वेबसाईटवर टास्क दिले. त्याने ते पूर्ण केल्याने तरुणाच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे त्याचा विश्वास बसला.  त्यानंतर अमृता जोशी नावाच्या महिलेने तरुणाला टास्क दिला. तो टास्क पूर्ण करुनदेखील त्याला पैसे मिळाले नाही. पुढील टास्क पूर्ण करावा लागेल, त्यासाठी पाच हजार रुपये भरा असे सांगितल्यानंतर तरुणाने पाच हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.त्यानंतरही टास्क पूर्ण करा अन्यथा पैसे स्टॉप होतील, पैसे टाकायला उशीर झाला, काही टास्कमध्ये लॉस झाला आहे तो भरावा लागेल, अकाऊंट स्टेबल करावे लागेल, असे वेगवेगळे कारणं सांगून या तरुणाकडून कधी पाच हजार, कधी १० हजार, ४९ हजार, ७२ हजार अशा प्रकारे प्रत्येक वेळी वाढीव रक्कम ऑनलाईन स्वीकारण्यात आली.  

... तोपर्यंत भरलेली रक्कम मिळणार नाहीआता पैसे भरु शकणार नसल्याचे तरुणाने सांगितले असता जो पर्यंत तुम्ही पैसे भरणार नाहीत, तो पर्यंत तुम्हाला पैसे परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी हा विद्यार्थी वेळोवेळी पैसे भरत गेला व सुमारे चार लाख ८९ हजार ४०० रुपये गमावून बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमर्या पटेल, मनोज कुमार, राघव दीक्षित, अमृता जोशी यांच्यासह अन्य एका जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस