शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनच्या ५२ वर्षीय ग्रंथालय परिचरने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

By विजय.सैतवाल | Updated: October 31, 2023 21:02 IST

पुस्तक बदलविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीवर ओढावला प्रसंग

जळगाव : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये पुस्तक जमा करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडभाने (५२, रा. समर्थ कॉलनी, रामानंद नगर) याने विनयभंग केला. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली.  या प्रकरणी मंगळवार, ३१ ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या जिल्ह्यातून जळगावात आजीकडे शिक्षणासाठी आलेली एक २० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाल्यानंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात पुस्तक जमा करण्यासाठी गेली. तेथे ग्रंथालय परिचर कैलास कडभाने याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह केला. त्यास विद्यार्थिनीने नकार दिला तरी तो वारंवार पुस्तक नेण्याविषयी तिला सांगत होता. तेथे ही विद्यार्थिनी सही करीत असताना कडभाने याने तिला स्पर्श केला. चुकीने धक्का लागला असेल म्हणून विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले.

ग्रंथालयातून जात असताना कडभाने याने तिचे बोट पकडून दरवाजा मागे ओढले व तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तिने कशीतरी सुटका करून घेत घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर विद्यार्थिनीने शिक्षिकेलाही याची माहिती दिली. विद्यार्थिनी व पालक यांनी घाबरलेल्या अवस्थेत श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, शहर प्रमुख अशोक शिंदे यांना मदत मागितले. त्यांच्यासह समाजसेविका सुचित्रा महाजन, दीपक दाभाडे यांनी विद्यार्थिनीला हिंमत देत पोलिसांकडे तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार सदर विद्यार्थिनीने ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कैलास कडभाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळJalgaonजळगाव