नंदुरबार : जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, त्यासाठी येत्या 19 डिसेंबरला मतदान होणार आहे. जुन्यांपैकी पळासवाडा, ता.शहादा तसेच नवीन निर्माण झालेल्या 96 अशा एकूण 97 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 30 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 4 डिसेंबर्पयत अर्ज भरण्याची मुदत असून, अर्जाची छाननी 5 तर 8 डिसेंबर ही माघारीची मुदत आहे. 19 डिसेंबरला मतदान होईल. 21 डिसेंबरला मतमोजणी होईल.
97 ग्रा.पं.च्या निवडणुका
By admin | Updated: November 22, 2015 00:47 IST