धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी सरासरी 95 टक्के मतदान झाले. 4711 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन पॅनलमध्ये सरळ लढत असल्याने प्रचंड चुरस पाहावयास मिळाली. 18 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात होते. सर्वाधिक 98 टक्के मतदान ग्रामपंचायत मतदारसंघात झाले. सोमवारी, 7 रोजी सकाळी 10 वाजता क्यूमाईन क्लब सभागृहात मतमोजणी होईल. साडेअकरा वाजेर्पयत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत निर्माण झालेली चुरस प्रचारादरम्यान आणखी वाढत गेली. त्यामुळे रविवारी मतदान केंद्रांवर प्रचंड गर्दी झाली होती.
धुळे कृउबासाठी 95 टक्के मतदान
By admin | Updated: December 7, 2015 00:10 IST