शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील 9 क्रीडा संकुले निधीअभावी अपूर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 12:42 IST

निधी अभावी जळगाव जिल्ह्यात सहा वर्षांपासून 9 तालुका क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत

ऑनलाईन लोकमत / संजय पाटील अमळनेर, जि. जळगाव, दि. 13 - एकीकडे राज्यात 20 हजार शाळांमध्ये फुटबॉल संघ तयार करण्याचे धोरण शासन राबवत आहे, मात्र निधी अभावी जळगाव जिल्ह्यात सहा वर्षांपासून 9 तालुका क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत असल्याची विसंगती आहे. ऑक्टोबर मध्ये फिफा फुटबॉल स्पर्धा भारतात होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार फुटबॉल खेळात आवड निर्माण व्हावी म्हणून राज्यात 20 हजार शाळांमध्ये फूटबॉल संघ निर्माण करण्याचे धोरण राबवले जात आहे. मात्र अनेक शाळांना मैदाने नाहीत, क्रीडा साहित्यासाठी अनुदान नाही. तसेच तालुका पातळीवर क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत पडले आहेत 2009 मध्ये तत्कालीन राज्यकत्र्यानी प्रत्येक तालुका पातळीवर सरासरी एक कोटींचे क्रीडा संकुल मंजूर केले होते. येणारे अनुदान आणि जागेची उपलब्धता यात दोन वर्षे गेली. मात्र 2011 पासून बांधकामांना सुरुवात झाली. अमळनेर येथील क्रीडा संकुल हॉल.चे बांधकाम, 400 मीटरचा ट्रॅक, संरक्षक भिंत आदी बाबी पूर्ण झाल्या आहेत. परंतु याठिकाणी इनडोअर बॅडमिंटन हॉल, फ्लोअरिंग, पाणी, विद्युत सुविधा, स्वच्छतागृह, आदी बाबी अपूर्ण आहेत. निधी पूर्ण मिळाला नाही म्हणून परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे मैदान खराब होत आहे. दरवर्षी महागाई वाढल्याने बांधकामाचे दर वाढले आहेत. क्रीडा संकुल पूर्ण होण्यासाठी अजून अंदाजे एक कोटींची आवश्यकता आहे. आमदार शिरीष चौधरी पाठपुरावा करीत आहेत. जिल्ह्यात जळगावचे क्रीडा संकुल सोडले तर सर्वत्र तीच परिस्थिती आहेतालुका क्रीडा अधिकारीच नाहीत जिल्ह्यात एकच तालुका क्रीडा अधिकारी मुक्ताईनगर येथे आहे. एरंडोल आणि चाळीसगाव येथे आता तालुका क्रीडा अधिकारी मंजूर झाले आहेत. उर्वरित तालुक्यांना क्रीडा अधिकारीच नाहीतकर्मचा:यांना अत्यल्प मानधनत्याच प्रमाणे प्रत्येक क्रीडा संकुलसाठी दोन कोच, प्रत्येकी 1500 रुपये मानधन होते. आता ते पाच हजार रूपये केले. एक लिपिक 1200 रूपये, एक शिपाई, एक चौकीदार 1000 रूपये महिना मानधनवर मंजूर आहेत. परंतु इतक्या तुटपुंज्या मानधनावर कोणीच काम करायला तयार नाही. त्यामुळे शासनाच्या विसंगत भूमिकेमुळे क्रीडा क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहेकेयर टेकर योजना जळगाव जिल्हयात अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, रावेर, एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव येथील क्रीडा संकुल निधी अभावी अपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांचा वापर होत नाही. पाठपुरावा लोकप्रतिनिधींमार्फत होत आहे. शासन केयर टेकर योजना आणत आहे त्यातून देखभाल व वापर सुरू होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सांगितले.