शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सारीचे ८४२; सर्दी, खोकला, तापाचे ६४९२ रुग्ण आले समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

स्टार ७६९ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात ...

स्टार ७६९

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात ८ लाख २१ हजार ४९ कुटुंबांतील ३३ लाख ९८ हजार २५७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सारीचे ८४२ तर सर्दी, खोकला, तापाचे ६ हजार ४९२ रुग्ण आले आहे. या सोबतच मोहिमेदरमम्यान ९७४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या काळात पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली.

या मोहिमेत आरोग्य पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान ज्या नागरिकांना जुने आजार, कोरोना सदृश्य लक्षणे आढळली त्यांची माहिती संकलीत करण्यात आली. तसेच लक्षणे आढळून आल्यास अशा संशयितांचे स्वॅब घेण्यात आले व जे कोरोना बाधित आढळून आले त्यांचे लक्षणानुसार वर्गीकरण करण्यात येऊन उपचार करण्यात आले.

खाजगी डॉक्टरांचीही मदत

या मोहिमेअंतर्गत खाजगी डॉक्टरांचीही मदत घेण्यात आली. त्यांच्याकडे काही संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांना या विषयी माहिती देण्यात सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडील रुग्णांची माहिती मिळण्यासह गावागावत सर्वेक्षण झाल्याने बाहेर गावाहून कोणी आलेले असल्यास त्यांचीही माहिती मिळू शकली.

एरंडोलला जास्त रुग्ण

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात विविध आजाराचे रुग्ण आढळून आले. यामध्ये सारीच्या रुग्णांचा विचार केला तर एरंडोल तालुक्यात सर्वाधिक २०१ रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल चोपडा तालुक्यातही १७५ सारीचे रुग्ण आढळून आले.

लक्षणानुसार वर्गीकरण व औषधोपचार

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या लक्षणानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. यात ज्यांना गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली त्यांच्यावरही लक्ष ठे‌वण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सोबतच सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले.

कोरोनाचे ९७४ तर सारीचे ८४२ रुग्ण

या अभियानात ९७४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. या शिवाय सारीचेही ९७४ रुग्ण समोर आले.

या मोहिमेत लवकर तपासणी झाल्याने रुग्णांना वेळीच दाखल करता आले. तसेच वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांवरदेखील वेळीच उपचार झाल्याने त्यांचा आजार वाढला नाही.

या सोबतच वेळीच कोरोनाचे रुग्णदेखील आढळून आल्याने संक्रमण रोखण्यासह मृत्यूदरही कमी होण्यास यामुळे मदत झाली.

एकूण कुटुंब संख्या - ८,२१,०४९

किती कुटुंबांचे झाले सर्वेक्षण - ७,५०,०८२

सर्वेक्षणासाठीची पथके - २९१३

पथकातील कर्मचारी - ८७३९

सहव्याधी असलेल्या व्यक्ती

अमळनेर- ८२७

भडगाव-११६४

भुसावळ - ८८१

बोदवड -१३०

चाळीसगाव - ५८६

चोपडा- ७४४

धरणगाव - १७०

एरंडोल-६२७

जळगाव - ३२२

जामनेर - ४२७

मुक्ताईनगर-३०

पाचोरा - ४४३

रावेर - २५४

यावल - ४२२

--------------

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत गावोगावी तपासणी झाल्याने वेळीच रुग्ण समोर आले. त्यामुळे त्यांना लगेच उपचारासाठी दाखल करता आले व संक्रमण रोखण्यासह मृत्यूदरही कमी होण्यास मदत झाली.

- डॉ. दिलीप पोटोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.