शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

चाळीसगाव तालुक्यातील मन्याड परिसरात ८० टक्के विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:24 IST

बंद पंपांचे सर्वेक्षण करून तात्पुरते बिल बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आडगाव, जि. जळगाव : मन्याड परिसरात अत्यल्प पावसामुळे नदी, नाले, बंधारे कोरडे पडले असून मन्याड धरणातही पाणी नसल्याने परिसरातील ८० टक्के विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाणीच नसल्याने कृषी पंप बंद असतानाही शेतकºयांना वीज बिल भरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणने सर्वेक्षण करून बिलाची योग्य आकारणी करावी, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.भू-जलपातळी खालावलीयावर्षी मन्याड परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने पावसाळा संपलयानंरही परिसरातील नदी, नाले, बंधारे, विहिरी कोरड्याच राहिल्याने तसेच मन्याड धरणदेखील कोरडेच आहे. त्यामुळे भू-जलपातळी खालावली असून परिसरातील जवळ-जवळ ८० टक्के विहिरींमध्ये पाणी नसल्याने त्यांनी तळ गाठला आहे.विहिरींमध्ये पाणीच नसल्याने जवळपास सर्व कृषी पंप बंदच असल्याची स्थिती आहे. काही पंप आक्टोबर ,नोंव्हेबरपासूनच बंद झाले तर काही पंप डिसेंबर, जानेवारीमध्ये फक्त साठवूण ठेवलेल्या विहिरीच्या पाण्यातून गुरांना पाणी पिण्यासाठी हाळ भरण्याचेच काम करत आहेत. महावितरणने या सर्व पंपाचे सर्वेक्षण करून बिल आकारावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अन्यथा बिलामुळे दुष्काळग्रस्त शेतकºयांना विनाकारण आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.२०१२मध्येही आक्टोबर, नोव्हेंबरपासून तर जून-जुलैपर्यंत जवळ जवळ ९ ते १० महिन्यांपर्यंत ५० टक्के शेतीपंप बंद असतानाही विज बिलाचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागला होता.चाराही धोक्यातमन्याड परिसरातील ज्या शेतकºयांच्या विहिरींना थोडेफार पाणी होते अशा शेतकºयांनी पशुधन जगविण्यासाठी चारा पिक म्हणून दादर, मक्याची लागवड केली होती. परंतु विहिरींच्या जलपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट झाल्याने सदर पिके करपून गेली आहेत. चारा, पाण्याअभावी पशुधन जगविण्यासाठी शेतकºयांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. येणारा उन्हाळा शेतकºयांसाठी कसोटीचाच ठरणार असल्याचे चित्र आहे.रब्बी हंगाम गायबसंपूर्ण परिीसरात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, नदी, नाले, बंधारे वाहून निघालेच नाही. त्यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने भूजलपातळी वाढलीच नाही. पाटाला व विहिरींना पाणीच नसल्याने रब्बीचा पेरा शेतकºयांना करता आला नाही. त्यामुळे परिसरात कुठेही गहू, हरबरा, भुईमूंग, सोयाबीनची पेरणी झालेली नाही. खरीपासह रब्बीचाही फटका बसल्याने मन्याड परिसरातील शेतकरी हवालदिली झाला आहे.चारा छावण्या उभाराव्यामन्याड परिसरात पाण्याची व चाºयाची बिकट परिस्थिती उद््भवल्याने या दोंन्ही गोष्टी विकतही मिळणे कठीण झाले आहे. जमिनीत पाणी नसल्याने नवीन विहिर किंवा कुपनलिका करूनदेखील उपयोग होत नाही. मग पाणी मिळणार तरी कुठून असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा आहे. दुसरीकडे परिसरात किंवा दुसºया तालुक्यात ज्यांच्याकडे चारा होता त्याने आधीच विकून टाकल्याने नवीन चारा पैसे देऊनही मिळत नाही. त्यामुळे शासनाने परिसरात लवकरात लवकर चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे.फळ पिक वाचविण्यासाठी लाखो रुपये पाण्यातमन्याड परिसरात बहुतेक शेतकºयांनी पिक पध्दत बदल म्हणून कुणी डाळींब, लिंबू, पपई, मोसंबी यांची लागवड केली आहे. मात्र पाणीच नसल्याने काही शेतकºयांनी फळांची झाडे उपटून फेकले तर काही शेतकºयांनी डाळींबाचा बहर पाहता पाणी अपूरे पडू लागल्याने कुणी टँंकरने तर कुणी पाईपलाईन करून लाखो रुपये खर्च करून बाग जगविण्यासाठी धडपड करीत आहेत.पुढे काय ?भीषण दुष्काळाला सामोरे जाताना शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव