शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

जळगावात रोज 80 रुग्णांचा डेंग्यूचा अहवाल ‘पॉङिाटीव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:54 IST

पॅथॉलॉजी लॅबचा अहवाल : 10 दिवसांपासून रुग्ण संख्येत दुपटीने वाढ

ठळक मुद्देरक्त नमुने तपासणीत वाढस्वाइन फ्लूची कीट मुंबईलाटायफाईडचेही अहवाल पॉङिाटिव्ह

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुन गुनियासारखे आजार वाढत असताना मनपा आरोग्य विभागाकडे केवळ ‘सदृश’ म्हणून रुग्णांची नोंद असली तरी खरी परिस्थिती पॅथॉलॉजी लॅबमधून समोर येत आहे. या ठिकाणी सध्या सर्वाधिक रक्त नमुने हे डेंग्यूच्याच तपासणीचे येत आहेत.  विशेष म्हणजे दररोज 70 ते 80 जणांचे नमुने पॉङिाटिव्ह येत असून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दुपटीने ही वाढ झाल्याचे चित्र आहे.  शहरात गेल्या महिनाभरापासून डेंग्यू व इतर आजारांनी  हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यातच साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यू, चिकुन गुनिया, मलेरिया हे सर्व आजार डासांमुळे होतात. यात केवळ डेंग्यू हा स्वच्छ पाण्यातील डासांमुळे होतो.  वाढत्या आजारामुळे शहरातील खाजगी दवाखाने फुल्ल आहेत. रक्त नमुने तपासणीचे प्रमाण वाढले आहे. तपासणीसाठी येणा:या रक्त नमुन्यांमध्ये जास्त प्रमाण डेंग्यूच्या तपासणीसाठीचे असल्याचे पॅथॉलॉजी लॅब चालकांचे म्हणणे आहे. केवळ डेंग्यूच्या चाचणीचेच प्रमाण जास्त आहे, असे नाही तर त्या तपासणी करण्यात येणा:या चाचण्यांमध्येही डेंग्यूचेच पॉङिाटिव्ह अहवालही जास्त आहे.  दररोज 70 ते 80 रुग्णशहरातील एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये येणा:या रक्त नमुन्यांच्या तपासणी अहवालामध्ये 8 ते 10 जणांचे अहवाल पॉङिाटिव्ह येत आहे. यामध्ये शहरातील एकूण 15 लॅबमधील ही सरासरी 70 ते 80 रुग्णांची असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

शहरात पॅथॉलॉजी लॅबमध्ये डेंग्यू सोबतच स्वाइन फ्लू व चिकुन गुनियाच्या चाचणीसाठीही रक्त नमुने येत आहेत. मात्र डेंग्यूची ज्या प्रमाणे शहरातच तपासणी होते तशी स्वाइन फ्लूची होत नाही. त्यामुळे ही कीट मुंबई येथे पाठविण्यात येते. त्यामुळे हे प्रमाण वाढत असले तरी नेमका आकडा अस्पष्ट आहे. अशाच प्रकारे चिकुन गुनियाचे नमुने तपासणीची सोय सर्वच लॅबमध्ये नसल्याने याचाही संख्या उपलब्ध होत नाही. मात्र दररोज 10 ते 12 जण  चिकुन गुनियाचे दवाखान्यात येत असल्याचे  सांगितले जात आहे. 

डेंग्यू खालोखाल टायफाईडच्या रुग्णांचे प्रमाण असल्याचे अहवालावरून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी दक्षता घेण्याचाच सल्ला दिला जातआहे. शहरातील सर्वच भागाला विळखा  शहरातील कोणत्या भागात रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, या बाबत माहिती घेतली असता जवळपास सर्वच भागातून रुग्ण येत असल्याचे समोर आले. यामध्ये महाबळ कॉलनी परिसर, संभाजीनगर, मेहरूण, रामानंदनगर, आदर्शनगर, आयोध्यानगर, दौलतनगर, मोहननगर, वाघनगर, एकनाथनगर, भिकमचंद जैन नगर, नंदनवन कॉलनी, ङोड.पी. कॉलनी तसेच या परिसरातील रेल्वे मार्गानजीकचा भाग या ठिकाणी हे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात आले. 

पालिकेत  8 फॉगिंग मशिन दाखलशहरात साथ रोगांचा फैलाव सुरू असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून प्रशासाने तातडीने 8 फॉगिंग (फवारणी) मशिन खरेदी केल्या आहेत.  त्याचा  शुभारंभ शनिवारी महापौर ललित कोल्हे यांच्याहस्ते करण्यात आला. या वेळी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, सुनील माळी, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, व्ही.एस. पांडे, डॉ. राम रावलाणी, प्रभाग अधिकारी उदय पाटील, अतिक्रमण निमरूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान आदी उपस्थित  होते.