चाळीसगाव : हिंगोणे सीम येथील वाळू चोरीचे प्रकरण चांगलेच तापले असले तरी वाळू चोरटे मात्र महसूल प्रशासनाला ठेंगा दाखवून आपला कार्यभाग साधत असल्याचे उघड झाले आहे. मेहुणबारे जवळील दसेगाव शिवारात गिरणा पात्रातून बैलगाडीव्दारे मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे.बुधवारी मेहुणबारे पोलिसांनी आठ बैलगाड्या पकडल्या आहेत. याबाबत महसूल प्रशासन काय कारवाई करते. याकडे लक्ष लागले आहे.जळगाव जिल्ह्यात लिलाव झाले नसल्याने वाळूला सोन्याच्या दरासारखा भाव मिळत आहे. वाळूच उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण व शहरातील अनेक बांधकामे बंद पडली आहेत. त्यामुळे काहीही करुन वाळू मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.चोरट्यांची शक्कलडंपर किंवा ट्रॅक्ट्रर मधून वाळू वाहतूक करणे सद्यस्थितीत जोखमीचे झाल्याने चोरट्यांनी शक्कल लढवून वाळूवर हात मारणे सुरुच ठेवले आहे. यासाठी कोणताही आवाज न करणा-या वाहतूकीचे सुरक्षित साधन म्हणून बैलगाड्यांचा उपयोग सुरु झाल्याचे उघड झाले आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्या ८ बैलगाड्या पकडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:48 IST