नंदुरबार : जिल्ह्यातील नवनिर्वाचित धडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 77 अर्ज दाखल करण्यात आले. धडगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 10 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. गेल्या तीन दिवसात एकूण 77 अर्ज दाखल झाले. यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. 18 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारीची अंतिम मुदत 28 डिसेंबर आहे.
धडगाव नगरपंचायतीसाठी 77 अर्ज दाखल
By admin | Updated: December 18, 2015 00:35 IST