शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७५० महाविद्यालये, पण बहुमान जळगावला! 

By अमित महाबळ | Updated: October 11, 2023 18:05 IST

शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्पर्धेचे आयोजन आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न महाविद्यालयांची राज्यस्तरीय आंतरविभागीय निवड चाचणी स्पर्धा दि. १३ व १४ रोजी, जळगावला होत आहे. शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्पर्धेचे आयोजन आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होतील. यामध्ये कबड्डी, खो-खो, बास्केट बॉल, व्हॉलिबॉल व ॲथलेटिक्सचा समावेश आहे. निवड चाचणीतून प्रत्येक खेळासाठी विद्यापीठ संघ निवडला जाणार आहे. राज्यातील महाविद्यालयांचे ९०० खेळाडू, संघ प्रबंधक व समन्वयक मिळून एक हजार जण जळगावमध्ये येणार आहेत. आयोजनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. अभिजित अहिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शासकीय होमिओपॅथिक व शासकीय आयुर्वेदिक कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी यांच्या १७ समिती गठीत करण्यात आल्या आहेत. सहसमन्वयक चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रा. एस. बी. चौधरी आहेत.

निवास व्यवस्था मुलांची खासगी मंगल कार्यालयात, तर मुलींची जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आली आहे. गुरुवारी, सकाळी ९ वाजेपासून संघांचे आगमन होईल. उद्घाटन दि. १३ रोजी, सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दि. १४ रोजी, दुपारी २ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मिलिंद निकुंभ यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी खेळाडूंचा कौतुक सोहळा होईल. समारोप रात्री ८ वाजता आहे. खान्देशी पदार्थ राज्यात पोहोचणारस्पर्धेच्या निमित्ताने खान्देशी खाद्यसंस्कृतीची ओळख राज्यात पोहोचवली जाणार आहे. त्यासाठी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या जेवणात शेवभाजी, भरीत, ठेचा-भाकरी, डाळ-गंडोरी आदी पदार्थांचा समावेश असणार आहे.

७५० कॉलेजमधून जळगावला संधीराज्यात मेडिकल व पॅरामेडिकलची ७५० महाविद्यालये आहेत. यातून स्पर्धा आयोजनाचा मान जळगावचे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाला मिळाला आहे. यामुळे जळगावच्या मेडिकल हबची संकल्पना राज्यात पोहोचण्यास मदत होणार आहे, असे आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव