शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ठेकेदाराच्या बंद घरातून ७४ हजारांचे दागिणे लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 20:25 IST

खंडवा येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाने रात्री साडे अकरा वाजता घर सोडल्यानंतर लगेच त्यांच्यापाठीमागे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे पाच वाजता आयोध्यानगरात उघडकीस आली. अशोक पुलचंद जैस्वाल यांच्याकडे ही घरफोडी झाली आहे.

ठळक मुद्दे आयोध्या नगरात घरफोडीकुटुंब गेले होते अंत्ययात्रेला एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : खंडवा येथे नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाने रात्री साडे अकरा वाजता घर सोडल्यानंतर लगेच त्यांच्यापाठीमागे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून ७४ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडे पाच वाजता आयोध्यानगरात उघडकीस आली. अशोक पुलचंद जैस्वाल यांच्याकडे ही घरफोडी झाली आहे.अशोक जैस्वाल यांचे काका रमेश वालचंद जैस्वाल यांचे खंडवा तालुक्यातील मुंदी गावात निधन झाले होते. त्यामुळे पत्नी ज्योती व मुलगा दिनेशसह हे रविवारी रात्री साडे अकरा वाजता रेल्वेने खंडव्याकडे जाण्यासाठी निघाले. तेथे पोहचताच सकाळी साडे पाच वाजता शेजारी राहणारे पुरुषोत्तम चव्हाण हे मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना जैस्वाल यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी लागलीच जैस्वाल यांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर जैस्वाल यांनी दिनेश याला परत घरी पाठविले. सकाळी ९ वाजता दिनेश घरी परतला असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त व कपाटातील दागिने गायब झाले होते.

अंत्यविधी सोडून मुलगा परतलाजैस्वाल हे रोज घरासमोरील पुरूषोत्तम चव्हाण यांच्यासोबत मॉर्निग वॉकला जातात. जैस्वाल गावाले गेले याबाबत चव्हाण यांना माहिती होती. चव्हाण नेहमीप्रमाणे ५ वाजता सकाळी उठले असता त्याना जैस्वाल यांचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तत्काळ याबाबत जैस्वाल यांना फोनवरुन माहिती दिली. तोपर्यत कुटूंब खंडव्याला पोहचले होते. याठिकाणी अशोक व त्यांची पत्नी पुढे रवाना झाले तर त्यांचा मुलगा दिनेश हा पुन्हा परतला. सकाळी जळगावात पोहचल्यावर त्याने घराची पाहणी केली. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दिली.

असा गेला मुद्देमाल चोरीला चोरट्यांनी २ ग्रॅमची २६ हजाराची सोन्याची साखळी, १५ ग्रॅमची १९हजार ५००  रुपयांची सोन्याची साखळी, १० ग्रॅम १३ हजाराची अंगठी, ७ ग्रॅमच्या ९ हजार १०० रुपयांच्या दोन अंगठ्या, ५ ग्रॅमची ६५०० रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण ७४ हजार १०० रुपयांचे दागिणे लांबविले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव