शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के सवलतमुळे खान्देशातील ७० हजार शेतकऱ्यांनी भरले बीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : सवलतीतील ६६ टक्के निधी वीजयंत्रणेच्या विस्तारी करणासाठी वापरणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महा ...

उत्स्फूर्त प्रतिसाद : सवलतीतील ६६ टक्के निधी वीजयंत्रणेच्या विस्तारी करणासाठी वापरणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महा कृषी ऊर्जा अभियानात महावितरणतर्फे कृषिपंपांच्या थकबाकीत विविध प्रकारची तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार या सवलतींचा लाभ घेऊन खान्देशातील सुमारे ७० हजार शेतकऱ्यांनी कृषि‌‌पंपाचे वीजबिल भरले आहे. यातून महावितरणच्या खात्यात ७७ कोटींचा भरणा झाला असून, यातील ६६ टक्के निधी हा वीजयंत्रणेच्या विस्तारी करणासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

शेतकरी बांधवांनी कृषिपंपाची थकबाकी भरण्यासाठी महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यात व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के, तर तिसऱ्या वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. या अभियानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे.

इन्फो :

७० हजार शेतकऱ्यांनी भरले बीजबिल

महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषिपंपांच्या वीज बिलापोटी जळगाव जिल्ह्यातील ३५ हजार ३८६ शेतकऱ्यांनी वीज बिल भरले असून, यातील ४४ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील २० हजार १९० शेतकऱ्यांनी १३ कोटी १३ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील १४ हजार ११९ शेतकऱ्यांनी १९ कोटी ३१ लाखांचा भरणा केला आहे. असे एकूण खान्देशात ६९ हजार ६९५ शेतकऱ्यांनी ७६ कोटी ७८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

इन्फो :

आमदारांनीही घेतला महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ

रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनीही या अभियानाचा लाभ घेऊन थकीत वीजबिल भरले आहे. त्यांनी खिरोदा व कुंभारखेडा येथील शेतातील दोन कृषिपंपांचे एक लाख ५६ हजार ४८० रुपये वीजबिल होते. महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याने त्यांना चालू बिलांसह केवळ ९५ हजार रुपये भरावे लागले आहेत. या रकमेचा धनादेश त्यांनी महावितरणच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.