शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भोरटेक शिवारात विषबाधेने ७० मेंढ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 19:32 IST

नीलकंद खाल्ल्याने विषबाधा होऊन ७० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर पशुवैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुमारे तीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदान मिळाले आहे. भोरटेक, ता.भडगाव शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली.

ठळक मुद्देतीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदानपशुमालकाने फोडला हंबरडागवत व कंद खाल्ल्याने घडली घटना पशुपालकाचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : नीलकंद खाल्ल्याने विषबाधा होऊन ७० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर पशुवैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुमारे तीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदान मिळाले आहे. भोरटेक, ता.भडगाव शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेत पशुपालकाचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सूत्रांनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चराईसाठी जळगाव जिल्ह्यात दरवर्षी आणतात. पिपराळा, ता.नांदगाव येथील भीमा सोमा शिंदे हे आपल्या परिवारासह साधारण चारशे ते पाचशे मेंढ्या व शेळ्या घेऊन जळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहेत.१८ रोजी होळ, ता.भडगाव शिवारात नांगरलेल्या शेतात आपल्या मेंढ्या चारून ते भोरटेक शिवारात पोहचले. दुसऱ्या दिवशी १९ रोजी सकाळी एका मागे एक करीत ७० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या व अनेक मेंढ्या ह्या अजूनही अत्यवस्थ आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्याने अंदाजे तीनशे ते चारशे मेंढ्या व शेळ्यांचा जीव वाचला.यांनी केले उपचारपशुवैद्यकीय अधिकाºयात डॉ.एस.व्ही. शिसोदे, एस.एस.कसबे, डॉ.डी. एम.महेर, डॉ.एस.के.शेळके, डॉ.जी.बी. माळी, डॉ.संताजी पाटील, डी. बी.पाटील,वाय. एन.जडे या टीमने वेळीच उपचार केल्याने बाकी मेंढ्या व शेळ्या वाचल्या. मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन जागेवरच करण्यात आले.तब्बल ७० ते ८० मेंढ्या प्राण सोडत असल्याचे पाहून पशुमालकाने एकच हंबरडा फोडला व मोठ-मोठ्याने छाती ठोकून रडायला लागला. त्यामुळे उपस्थित लोकांचेही मन गहिवरले होते.या मेंढ्यांनी कुठले तरी गवत व काही कंद खाल्ल्यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.या घटनेमुळे कजगाव व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पंचनामा भोरटेकचे तलाठी रत्नदीप माने यांनी केला. यावेळी तालुका कृषीधन विकास अधिकारी डॉ.एस.व्ही. शिरोडचे पशुधन विकास अधिकारी डॉ.सागर कसबे, भोरटेकचे सरपंच उमेश देशमुख, ग्रामसेवक एस.बी.मोरे, भोरटेकचे पोलीस पाटील राजेंद्र महाजन, दिनेश पाटील, कजगावचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, डॉ.दिनकर मेहेर, सुधाकर शेळके, डी.बी.माळी, दिलीप पाटील, योगेश जडे, सतीश पाटील आदी उपस्थित होते.मोठे संकटगेल्या तीन वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाने पशुधन सांभाळणे मुश्किल झाले आहे . त्यांचा जीव वाचविण्यासाठी पशुमालक वाट्टेल ते प्रयत्न करत आहेत. ते वाचवत असतानाच या मेंढपाळावर आलेले हे मोठे संकट आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यBhadgaon भडगाव